Bajrang Dal, Ekanth Shinde Sarkarnama
पुणे

Bajrang Dal : लोहगडावरील अतिक्रमण हटवा अन्यथा..., बजरंग दलाचा सरकारला अल्टिमेटम

सरकारनामा ब्युरो

Bajrang Dal On Maharashtra Govt : सकल हिंदू बांधवांच्या वतीने लोहगड अतिक्रमणमुक्त व्हावा म्हणून महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बजरंग दलाने राज्य सरकारला अल्टिमेटम दिला आहे.

पुढील महिन्याभरात लोहगडावरील अतिक्रमण न काढल्यास बेमुदत आंदोलन करण्याचा इशारा बजरंग दलाकडून देण्यात आला आहे. 'हे महादेवा शक्ती दे, लोहगडला मुक्ती दे' अशा घोषणांनी लोहगडचा पायथा दणाणून गेला होता.

बजरंग दलाचे (Bajarang Dal) कार्यकर्ते आणि मोठ्या प्रमाणात शिवभक्त लोहगडावर मोठ्या संख्येने उपस्थित होते. मराठ्यांच्या इतिहासाचा साक्षीदार असलेल्या लोहगडावर मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम करण्यात आलं आहे.

या बांधकामामुळे या गडाचे वैभव व पावित्र्य नष्ट होऊ लागले आहे. त्यामुळे हे अनधिकृत बांधकाम त्वरित काढण्यात यावे यासाठी बजरंग दलाच्या वतीने केंद्रीय पुरातत्व विभाग, राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सांस्कृतिक मंत्री, जिल्हाधिकारी, तसेच तहसीलदार मावळ यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे. यावेळी लोहगडावर लोणावळा ग्रामीण पोलिसांच्या वतीने मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

बजरंग दलाचा सरकारला अल्टीमेटम

लोहगडावरील (Lohgad) अनधिकृत बांधकामे हटविण्याबाबत मागील कित्येक वर्ष बजरंग दल संघटनेमार्फत सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. मात्र, याबाबत कुठलीही अधिकृत माहिती संघटनेला आजपर्यंत देण्यात आलेली नाही अथवा अनधिकृत बांधकामावर अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली आहे.

जर पुढील महिन्याभरात लोहगड अतिक्रमण विरहित दुर्ग आम्हाला पहायला मिळाला नाही तर 11 ऑगस्ट रोजी बजरंग दलाच्या व मावळातील जनतेच्या वतीने तीव्र व बेमुदत आंदोलन करणार असल्याचा इशारा बजरंग दलाचे मावळ तालुका संदेश भेगडे यांनी दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT