Rajabhau Waje Politics: ठाकरे गटाच्या खासदाराकडून पंकजा मुंडे यांचं अभिनंदन, काय आहे कारण?

MP Rajabhau Waje congratulations bjp mla Pankaja Munde:सिन्नर मतदार संघात गोपीनाथ मुंडे आणि आता पंकजा मुंडे यांना मानणारा मोठा मतदार आहे. हा मतदार आणि वाजे हे प्रत्येक निवडणुकीत एकत्र असतात.
Rajabhau Waje Politics
Rajabhau Waje PoliticsSarkarrnama
Published on
Updated on

Rajabhau Waje news: भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांची विधान परिषदेवर निवड झाली. यानिमित्ताने मुंडे यांचा राजकीय वनवास संपुष्टात आला. त्यांचे मोठ्या प्रमाणावर सिन्नर येथे स्वागत करण्यात आले.

यानिमित्ताने समाज माध्यमांवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार राजाभाऊ वाजे (Rajabhau Waje) यांनी आमदार मुंडे यांचे अभिनंदन केले. या अभिनंदनची विशेष चर्चा आहे. पक्षभेद बाजूला सारत खासदार वाजे यांनी केलेल्या या अभिनंदनाला विविध राजकीय संदर्भ आहेत.

खासदार वाजे सिन्नर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. मतदारसंघात मुंडे यांना मानणारा मोठा वर्ग आहे.विशेषतः वंजारी समाजाचे राजकीय प्राबल्य आणि राजकारणातील उपद्रवमूल्य सर्वश्रुत आहे.

सिन्नर मतदारसंघात पक्षीय विचारधारेला फारसे महत्त्व दिले जात नाही. गेली अनेक वर्ष येथे सत्ताधारी आणि विरोधक असे दोन गट पडले आहेत. सर्व पक्षांचे राजकीय कार्यकर्ते आणि नेते सोयीनुसार त्या त्या गटात सामील होतात.

सध्या येथे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माणिकराव कोकाटे आमदार आहेत. आमदार कोकाटे यांचा गट आणि त्यांच्या विरोधात खासदार राजाभाऊ वाजे यांचा गट अशी विभागणी आहे. त्यात आता उदय सांगळे हे देखील तिसरी शक्ती म्हणून मतदारसंघात आपली ओळख निर्माण करण्यासाठी धडपडत आहेत.

Rajabhau Waje Politics
Vidarbha Politics: विदर्भात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा कॉन्फिडन्स वाढला; 'या' विधानसभांवर ठोकला दावा

सिन्नरच्या राजकारणात शीतल सांगळे यांना शिवसेना-भाजप युतीची सत्ता असताना आमदार खासदार वाजे यांनी आपली राजकीय प्रतिष्ठा पणाला लावून जिल्हा परिषदेचे अध्यक्ष केले होते. खासदार वाजे त्याचा उल्लेख करताना शितल सांगळे यांच्या ऐवजी एका समाजाला म्हणून प्रतिनिधित्व मिळावे, म्हणून नाशिक जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद श्रीमती सांगळे यांना दिले होते असे सांगतात.

गेली अनेक वर्ष हा समाज वाजे यांच्या बरोबर आहे. प्रत्येक निवडणुकीत या समाजाचे मोठे पाठबळ खासदार वाजे यांना असते. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत देखील सिन्नर तालुक्यातील दोन्ही गट एकत्र आले होते. हा समाज देखील श्री वाजे यांच्या पाठीशी उभा राहिला होता.

स्थानिक समीकरणांमुळे वाजे यांना सिन्नर विधानसभा मतदारसंघातून मोठी आघाडी मिळाली होती. आघाडीच्या बळावरच ते निवडणूक जिंकले. सिन्नर मतदार संघात प्रारंभी गोपीनाथ मुंडे आणि आता पंकजा मुंडे यांना मानणारा मोठा मतदार आहे.

हा मतदार आणि वाजे हे प्रत्येक राजकीय घडामोडीत आणि निवडणुकीत एकत्र असतात. यासंदर्भांमुळेच खासदार वाजे सध्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात असेल तरीही त्यांनी हे पक्षीय भेद बाजूला ठेवून भारतीय जनता पक्षाच्या नवनिर्वाचित विधान परिषद सदस्य पंकजा मुंडे यांचे अभिनंदन केले आहे.

समाज माध्यमांवर आणि प्रत्यक्ष संपर्क करून देखील त्यांनी पंकजा मुंडे यांना शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र या शुभेच्छांमुळे त्यांचे समर्थक आणि काही विरोधक यांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यामुळे तो चर्चेचा विषय आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com