Rohini Khadse Rupali Chakankar sarkarnama
पुणे

Rohini Khadse VS Rupali Chakankar : रुपाली चाकणकरांनी पोलिस आयुक्तांना पत्र पाठवताच रोहिणी खडसेंचा पलटवार; म्हणाल्या 'बॉल, बॅट आणि...'

Pune Drugs Party Pranjal Khewalkar : महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांना महिलांवर अत्याचार होत असताना इतकी कार्यतत्परता आताच कशी? असा टोला रोहिणी खडसे यांनी लगावला आहे.

Sudesh Mitkar

Pune News : पुण्यातील खराडीमधील रेव्ह पार्टी प्रकरणात माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांच्या सह सात जणांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. त्यानंतर या प्रकरणांमध्ये रोज नवीन गोष्टी समोर येत आहेत. आता बीडमधील सानवी बहुद्देशीय सेवाभावी संस्थेने खेवलकर यांच्याविरोधात राज्य महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. तक्रारीत खेवलकर यांनी खराडी येथील एक हॉटेल 28 वेळा बुक केल्याचा दावा केला आहे. तसेच त्यांनी अनेकदा मुलींना तिथे बोलावल्याचा आणि मानवी तस्करीच्या रॅकेटचा भाग असल्याचा संशय व्यक्त केला आहे.

याप्रकरणी राज्य महिला आयोगाने पुणे पोलिसांना चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे सोशल मीडियावर रुपाली चाकणकर आणि रोहिणी खडसे यांच्यातील आरोप-प्रत्यारोप पुन्हा चर्चेत आले आहेत. तीन मुद्दे मांडत रोहिणी खडसेंनी चाकणकरांवर निशाणा साधला आहे.

रोहिणी खडसे म्हणाल्या, नुकतेच माध्यमांमधून महिला आयोगाने डॉ. खेवलकर यांच्या प्रकरणात पुणे पोलिस आयुक्तांना दिलेले पत्र वाचले. यानंतर काही मुद्दे समोर आणावे वाटत आहे.

मुद्दा क्र. १. ज्या सानवी बहुद्देशीय सेवाभावी संस्थेने या प्रकरणात राज्य महिला आयोगात तक्रार दाखल केली आहे. ती संस्था राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या महिला विभागाच्या बीड जिल्ह्याची अध्यक्षा प्रज्ञा खोसरे यांची आहे.

मुद्दा क्र. २ राज्यात महिलांच्या विरोधात इतके प्रकरण घडली, वैष्णवी हागवणे आत्महत्या प्रकरणासारखे हुंडाबळीचे प्रकरण घडले. यात खुद्द अजित पवार गटाच्या पुण्यातील महत्त्वाचे पदाधिकारी आरोपी आहेत. तेव्हा ही संस्था कुठे होती ? राज्यात महिलांवर इतके अत्याचार होतात तेव्हा ही संस्था कुठे होती ? मग आताच ही संस्था बाहेर कशी काढली गेली ?

मुद्दा क्र. ३ राज्यातील अत्याचारग्रस्त महिलांची साधी विचारपूसही न करणाऱ्याला महिला आयोग अध्यक्षांना आज अचानक कसे कर्तव्य आठवले ? इतके कसे कार्यतत्पर झाले ?

आपली बॅट आणि...

रोहिणी खडसे यांनी तीन मुद्दे उपस्थित करत रुपाली चाकणकर यांना टोला लगावत म्हटले आहे की, आपलाच बॉल, आपलीच बॅट आणि आपणच सिक्सर मारणार ! सगळं व्यवस्थित स्क्रीप्टनुसार सुरू आहे. दरम्यान, खडसे यांनी उपस्थित केलेल्या मुद्यांना चाकणकर काय उत्तर देणार याची उत्सुकता राजकीय वर्तुळात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT