Rohit Pawar Vs Shankar Mandekar sarkarnama
पुणे

Rohit Pawar Vs Shankar Mandekar : आमदार शंकर मांडेकरांची रोहित पवारांना धमकी? स्वतः सांगितले ईडीला घाबरत नाही तुम्ही तर...

Rohit Pawar Alleges Shankar Mandekar : दोन तीन एफआयआर आमच्यावर झाल्यात. अहो आम्ही ईडीला नाही घाबरत तुम्हाला काय घाबरणार, असे रोहित पवार म्हणाले.

Roshan More

Rohit Pawar Politics : मुळशीचे आमदार शंकर मांडेकर यांचा भाऊ बाळासाहेब मांडेकर याला वखारीतील न्यू अंबिका कला केंद्रात गोळीबार केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. आत्ता या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी धक्कादायक दावा केला आहे. या संदर्भातील वृत्त 'साम टिव्ही'ने दिले आहे.

आमदार मांडेकर यांचे नाव न घेता रोहित पवार म्हणाले, 'या भागातील आमदार फारच ताकदवान आहेत. आम्हालाही धमकी दिली कुठंतरी. दोन तीन एफआयआर आमच्यावर झाल्यात. अहो आम्ही ईडीला नाही घाबरत तर तुम्हाला काय घाबरणार.'

'पोलिस स्टेशनवर तुम्ही गेला तर अधिकाऱ्यासमोर सर्वसामान्य माणसाचे विषय मांडत असाल जर पुढचा अधिकारी जर मोठ्या आवाजात बोलत असेल तिथला तिथं बोलायचं आवाज खाली. महाराष्ट्रामध्ये पोलिस स्टेशमध्ये तेव्हा आपले ऐकले जात नाही.', असे देखील रोहित पवार म्हणाले.

गोळीबार प्रकरणाची अजितदादांकडून दखल

दौंड गोळीबार प्रकरणाची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दखल घेतली आहे. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, मी या संदर्भात एसपींच्या संपर्कात आहे. गोळीबार करणाऱ्यांना सोडण्यात येणार नाही. त्यांना अटक केली आहे. जर शक्य असेल तर त्यांना मकोका लावा, अशा सूचना मी त्यांना दिल्या आहेत. तसेच कुठलाही राजकीय दबाव घेऊ नका असे देखील मी त्यांना सांगितले आहे.

माझा भाऊ समाजकार्य करतो...

शंकर मांडेकर यांनी गोळीबार प्रकरणावर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, माझ्या भावाकडे बंदूकीचे लायसन्स नाही. त्याच्यासोबत जे गणपत जाधव आहे त्याच्याकडे बंदुकीचे लायसन्स आहे. माझा भाऊ हा समाजकार्यात असतो. आमची शेती पाहतो तो कला केंद्रात गेला हे शाॅकिंग आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT