Rohit Pawar News Sarkarnama
पुणे

Rohit Pawar News : अजितदादांना मोदी-शाहांचा व्हायरस; म्हणून ते पन्नास टक्के खोटे बोलू लागले; रोहित पवारांनी सुनावले!

Lok Sabha Election 2024 : माझ्या आमदारकीबाबत सांगायचं झालं तर मी दोन वर्षे कर्जत जामखेडमध्ये काम करत होतो. शरद पवारसाहेबांनी मला अवघड मतदारसंघ निवडायला सांगितला.

Chetan Zadpe

Pune News : बारामती लोकसभा मतदारसंघात प्रचार सभेत भाषण करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांना तिकीट देण्यासाठी शरद पवारांचा विरोध असतानादेखील मी त्यांना एबी फॉर्म दिला, असा दावा केला होता. अजित पवारांच्या या दाव्यावर आता खुद्द आमदार रोहित पवार यांनीच खुलासा केला आहे. (Latest Marathi News)

अजित पवार यांनी गेल्या काही दिवसांपासून रोहित पवार यांच्यावरती केलेल्या ठिकाणांना उत्तर देताना ते म्हणाले, कदाचित त्यांचं माझ्यावर प्रेम असेल, पण काका म्हणून माझं प्रेम आहे त्यांच्यावर आहे. माझ्या आमदारकीबाबत सांगायचं झालं तर मी दोन वर्षे कर्जत जामखेडमध्ये काम करत होतो. शरद पवारसाहेबांनी मला अवघड मतदारसंघ निवडायला सांगितला. त्यामुळे जिथं काम करायला मिळेल, असा मतदारसंघाचा शोध घेतला. मी काम केलं. मला अजित पवार यांनी निवडणुकीत निवडून येण्यास मदत झाली. त्यांनी अनेक प्रचार सभा माझ्यासाठी घेतल्या. त्यांच्या मार्गदर्शनाखाली चालणारे कारखाना कर्जत जामखेडला आहे, त्याचाही फायदा झाला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मात्र सुरुवातीला मी जिल्हा परिषदेची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता, त्यावेळी शरद पवारांनी त्याला विरोध केला. कदाचित त्यांना मी आमदारकी लढावी असं वाटत असेल. परंतु मला राजकारण करायचं होतं म्हणून मी जिल्हा परिषदेसाठी आग्रही होतो. एबी फॉर्म चा विचार केला असता राज्यातील सर्व एबी फॉर्म देण्याची जबाबदारी ही अजित पवार (AJit Pawar) यांच्यावर होती. त्यामुळे त्यांनी मला एबी फॉर्म दिला होता, मात्र मी कधी अपक्ष निवडणूक लढणार नव्हतो. सध्या दादा 50 टक्के खरं आणि 50 टक्के बोलत आहेत, पूर्वी ते शंभर टक्के खरं बोलत असायचे मात्र भाजपच्या प्रभावामुळे आता ते 50 टक्क्यावर आले आहे. पुढे जाऊन दहा दिवसांनंतर अजित पवार यांचं भाषण मोदी शाहासारखे होतील. कारण भाजप एक व्हायरस आहे आणि हा व्हायरस दादांना (Ajit Pawar) लागला तर भविष्यात त्यांना मोठ्या प्रमाणात अडचणींना सामोरे जावं लागेल.

पार्थ पवारांवर निशाणा -

पुणे दौऱ्यावरती असताना रोहित पवार यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. या वेळी रोहित पवार म्हणाले, "पार्थ पवारांना खूप कमी दर्जाची सिक्युरिटी दिलेली आहे, पंतप्रधान यांना जी सिक्युरिटी वापरली जाते ती सिक्युरिटी द्यायला पाहिजे, असा खोचक टोला रोहित पवार यांनी लगावला. ते पुढे म्हणाले, 'काही विश्लेषक याबद्दल वेगळ्या अर्थाने बोलत आहेत."

पार्थ पवार यांना पुरवण्यात आलेल्या सिक्युरिटीमध्ये मध्यभागी एक गाडी असते. दोन्ही बाजूला दोन गाड्या असतात, त्यामुळे इलेक्शनमध्ये जो पैसा वापरला जाणार आहे. तो पैसा या गाड्यामधून जाईल की काय? अशी शंका व्यक्त केली जात आहे. सिक्युरिटी गाड्या एका राजकीय व्यक्तीच्या मुलाला दिल्या जात असतील तर अनेक शंका निघू शकतात. ते हे सर्व जनतेसमोर येईल, असेदेखील रोहित पवार (Rohit Pawar) म्हणाले.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT