Rohit Pawar, Sharad Pawar & Ajit Pawar Sarkarnama
पुणे

Rohit Pawar On Ajit Pawar : शरद पवारांसोबत एकाच मंचावर येणं अजितदादांनी टाळलं? रोहित पवारांनी खोचक...

Chetan Zadpe

Pune News : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत एकत्रित मंचावर येण्याचे पुन्हा एकदा टाळले आहे. अजित पवार वसंतदादा शुगर इन्स्टीट्युटच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाहीत, अशी माहिती मिळत आहे.

वसंतदादा शुगर इन्स्टीट्युटची ४७ वी सर्वसाधरण सभा आज पुण्यातील मांजरी येथे पार पडत आहे. या सभेला अध्यक्ष या नात्याने शरद पवार उपस्थित राहणार आहेत. तर कार्यकारी मंडळाचे सदस्य म्हणून अजित पवार हे उपस्थित राहणे अपेक्षित होते. मात्र अजित पवार येणार नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे. (Latest Marathi News)

अजित पवार सर्वसधारण सभेला येणार नाहीत याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांना विचारले असता, रोहित पवार म्हणाले, "अजितदादा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत. त्यांनी काहीतरी महत्त्वाचे काम आलं असावं, म्हणून ते येणार नाहीत . सहसा कोणाचंही सरकार असलं तरी वसंतदादा शुगर इन्स्टीट्युटच्या कार्यक्रमाला सगळे पदाधिकारीपासून सर्व प्रमुख नेते उपस्थित राहतात. सभा ऊस शेतकऱ्यांसी निगडीत असतात. त्यामुळे सर्व नेते येत असतात."

"अजित पवार हे शरद पवार यांच्या समोर येण्याचं टाळतात का असा प्रश्न रोहित पवारांना विचारल्यावर ते म्हणाले, "नाही, याबाबत मला सांगता येणार नाही. जेव्हा पंतप्रधान पुण्यात आले, तेव्हा अजित पवार मंचावर उपस्थित होते. मात्र आता मुख्यमंत्री आणि दुसरे उपमुख्यमंत्री कार्यक्षम नसवल्यामुळे एका मुख्यमंत्र्याला तरी कार्यक्षम राहावं लागेल, म्हणून महाराष्ट्र कुणीतरी चालवावा, यामुळे अजितदादा काम करत असावेत, बाकीचे काम करत नसावेत," अशा शेलक्या शब्दात रोहित पवार यांनी शिंदे-फडणवीस-पवार सरकारला जोरदार टोला लगावला.

'वसंतदादा' सर्वसाधरण सभा -

पुण्यातील मांजरी या ठिकाणी असलेल्या वसंतदादा शुगर इन्स्टीट्युटची आज ४७ वी सर्वसाधरण सभा पार पडणार आहे. वसंतदादा शुगर इन्स्टीट्युटचे अध्यक्ष या नात्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित राहणार आहेत. तर कार्यकारी मंडळाचे सदस्य म्हणून अजित पवार हे उपस्थित राहणार होते. मात्र, ठरलेल्या कार्यक्रमाला ऐनवेळी अजित पवार येणार नसल्याची माहिती पुढे येत आहे.

(Edit By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT