NCP Crisis : यापुढे शरद पवार यांच्या वयाचा मुद्दा काढल्यास त्याच भाषेत उत्तर देऊ; अजितदादांना थेट इशारा

Sharad Pawar Group Questions Ajit Pawar : राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पुरुषोत्तम कडलग उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर भडकले...
Ajit Pawar News
Ajit Pawar NewsSarkarnama

Maharashtra Politics Latest News : उपमुख्यमंत्री अजित पवार हे सातत्याने शरद पवार यांच्या वयाबाबत टीका करीत आहेत. त्यावर राष्ट्रवादी युवक काँग्रेसने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना प्रत्युत्तर दिले आहे. यापुढे शरद पवार यांच्या वयाचा मुद्दा काढल्यास त्याच भाषेत अजित पवारांना उत्तर देऊ, असा इशारा दिला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) विविध कार्यक्रमात आणि सभांमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार हे सातत्याने ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या वयाचा मुद्दा पुढे करीत आहेत. ते सतत शरद पवार यांच्यावर टीका करतात. यावरून शरद पवारांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस आक्रमक झाली आहे. Ajit Pawar यांनादेखील त्याच भाषेत उत्तर देण्याचा निर्धार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Ajit Pawar News
Nashik District Politics : भुजबळ गेले, दादा आले अन् कांदे बदलले

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे (शरद पवार) प्रांतिक अध्यक्ष पुरुषोत्तम कडलग म्हणाले, 'अजितदादा आता बस करा, कुठेतरी थोडं थांबायलाही शिका. तुम्ही स्वतः 65 वर्षांचे आहात आणि तुमचे आवडते सहकारी छगन भुजबळ 78 वर्षांचे आहेत.'

'पक्षाशी बेईमानी केलेले 78 वर्षांचे छगन भुजबळ तुम्हाला चालतात आणि देशाच्या राजकारणात एक आदर्श निर्माण करणारे आणि आपल्या राजकीय विचारांची पालखी घेऊन चाललेले तुमचे काका शरद पवार यांच्या वयाबद्दल तुम्ही बोलता, हे तुम्हाला योग्य वाटते का?' असा प्रश्न कडलग यांनी केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

कडलग कडलक म्हणाले की, 'अजितदादा तुमच्या बायोडाटामधून शरद पवार वजा केले तर आपली किंमत शून्य आहे. आपली सर्व राजकीय कारकीर्द पूर्णतः शरद पवार यांच्या सावलीत झाली आहे. आज महाराष्ट्र जो काही तुम्हाला ओळखतो, त्यात शरद पवार नसते तर काय झाले असते? असा विचार आपण केला पाहिजे. तुम्ही महाराष्ट्रासाठी कोणता विकासाचा अजेंडा राबवला आहे, कोणता कार्यक्रम घेऊन चाललेला आहात हे आधी सांगा.'

उपमुख्यमंत्री पवार यांना भारतीय जनता पक्षाने आपल्या गटात सहभागी केले आहे. त्यामागे कोणते कारण आहे? राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पक्ष आणि नाव कोणामुळे आहे? महाराष्ट्रातील जनता हा सारासार विचार नक्कीच करते. शरद पवार यांच्या पलिकडे आजही अजित पवार यांच्याकडे कोणताही मुद्दा नाही, असे ते वारंवार सिद्ध करीत असल्याची टीका कडलग यांनी केली.

edited by sachin fulpagare

R...

Ajit Pawar News
Samir Bhujnal : समीर भुजबळ मुंबईत, तर नाशिकमध्ये कोण?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com