Rohit Pawar, Ajit Pawar Sarkarnama
पुणे

Rohit Pawar : अजितदादांची शेवटची इच्छा पूर्ण होणार; 9 तारखेनंतर राजकीय चर्चेला सुरुवात...; रोहित पवारांनी सगळं सांगितलं

Rohit Pawar NCP Ajit Pawar : रोहित पवार यांनी आज मतदानानंतर माध्यमांशी संवाद साधताना मोठे संकेत दिले. अजितदादांची शेवटची इच्छा पूर्ण होणार असल्याचे ते म्हणाले.

Roshan More

Rohit Pawar News : अजित पवारांशिवाय पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा परिषद निवडणुकीला सामोरी जात आहे. आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मतदान केले. पवार कुटुंबीय त्यांच्यासोबत उपस्थित होते. त्यानंतर पिंपळी गावात आमदार रोहित पवार यांनी आपल्या कुटुंबासोबत मतदानाचा हक्क बजावला. मतदानानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

ते म्हणाले, 'मतदानावेळी दादांसोबत झालेली चर्चा परत कानात ऐकू यायला लागली. दादांचे जे स्वप्न होतं जिल्हा परिषदची निवडणूक आहे, त्यामध्ये जास्तीत जास्त कार्यकर्ते निवडून यावे, ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. हे त्यांचे अंतिम स्वप्न होतं. दादांचे शेवटचे स्वप्न नक्की पूर्ण होईल. त्यांचे कार्यकर्ते निवडून येतील.'

'दादांची इच्छा होती की परिवार म्हणून सर्वच एकत्रित आले पाहिजेत. त्या पद्धतीने दादांकडून प्रयत्न करत होते. सुप्रियाताई, पवारसाहेब आम्ही सगळे जण तसाच काहीसा प्रयत्न करत होतो. दु:खद घटना घडल्यानंतर परिवार १३ दिवस एकत्रित आहे. याच्या पुढे देखील अजितदादाचे स्वप्न परिवार म्हणून एकत्रित राहिले पाहिजे. तसंच होईल. सर्वांनी एकत्रित मतदान केले. परिवार पुन्हा एकत्रित येताना दिसतोय.', असे देखील त्यांनी सांगितले.

राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत तसेच परिवारात राजकीय चर्चा झाली का? याबाबत त्यांना विचारले असता ते म्हणाले, 'अजूनपर्यंत पार्थ, जय आम्ही कुणी या दु:खातून सावरलो नाहीत. घटना दुर्देवी होती. जसंजसं विचार करायची क्षमता येईल तसे आम्ही सांगू. पण या काळात पवार कुटुंबामध्ये कुठेही राजकीय चर्चा झाली नाही. मात्र 9 तारखेनंतर यावर चर्चा होईल.'

शरद पवारांचे मार्गदर्शन

शरद पवार हे पार्थ पवार, रोहित पवार यांना मार्गदर्शन करत असलेला फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. या विषयी बोलताना ते म्हणाले, 'काही प्रमाणात भावनिक मार्गदर्शन होतं. काही दिवसांत काही गोष्ट आपल्याला कराव्या लागतील, राजकीय नाही. दादांच्या स्मरणार्थ त्या कशा केल्या पाहिजेत, या विषयीचे चर्चा झाली.'

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT