

Kolhapur News: कोल्हापूर जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी सकाळपासून शांततेत मतदानास सुरुवात झाली आहे. आगामी काळात जिल्हा परिषद अध्यक्षपद भाजपच्याच ताब्यात राहील, असा विश्वास चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांनी व्यक्त केला. नगरपालिका निवडणुकांमधील ‘चंदगड पॅटर्न’ आता संपुष्टात आल्याचा दावा करताना, जिल्ह्यातील विरोधकांनी निवडणुकीत पैशाचा मोठ्या प्रमाणावर वापर केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
चंदगड तालुक्यातील जिल्हा परिषदेचा अडकूर मतदारसंघ वगळता अन्य तीन मतदारसंघात दुरंगी लढती होत आहेत, तर पंचायत समितीसाठी दोन गण वगळता उर्वरित सहा गणांत तिरंगी लढत होत आहे. जिल्हा परिषदेच्या चार जागांसाठी नऊ उमेदवार, तर पंचायत समितीच्या आठ जागांसाठी २६ उमेदवार रिंगणात आहेत.
निवडणुकीत भाजपविरोधात राष्ट्रवादी अजित पवार गट व शरद पवार गट एकत्र आले आहेत. विधानसभा निवडणुकीत एकत्र राहिलेल्या महाविकास आघाडीपैकी काँग्रेस व शिवसेना ठाकरे गटाने तटस्थ भूमिका घेतली आहे. अडकूर जिल्हा परिषद मतदारसंघात काँग्रेसने स्वतंत्र उमेदवार ठेवला आहे.
शिवसेना शिंदे गटाने उमेदवारी अर्ज दाखल करून आव्हान निर्माण केले होते. मात्र, आज या पक्षाच्या उमेदवारांनी माघार घेतली. या निवडणुकीत काँग्रेस, दोन्ही शिवसेनेचे अस्तित्व पुसट झाल्याचे जाणवले. त्यामुळे राष्ट्रवादी विरुद्ध भाजप, अशी थेट आणि रंगतदार लढत होत आहे.
भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशी थेट लढत माजी जिल्हा परिषद सदस्या ज्योती पाटील व विद्या पाटील पुन्हा आमने-सामने माजी जिल्हा परिषद सदस्य कल्लाप्पा भोगण यांची कन्या मानसी रिंगणात माजी सदस्य भरमाणा गावडे व सचिन बल्लाळ यांच्या पत्नींत होणार लढत काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट, शिवसेना शिंदे गटाचे अस्तित्व पुसट झाले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.