Rohit Pawar Sarkarnama
पुणे

Rohit Pawar News : '.. त्यामुळे सरकारने विद्यार्थ्यांना हलक्यात घेऊ नये'; बांगलादेशचं उदाहरण देत रोहित पवारांचा इशारा!

Sudesh Mitkar

Pune News : पुण्यामध्ये एमपीएससीची विद्यार्थी आंदोलनाला बसले आहेत.MPSC आणि IBPS या दोन्ही महत्वपूर्ण परीक्षा पुन्हा एकदा एकाच दिवशी आल्या आहेत. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आणि संतापाचे वातावरण तयार झाले आहे.

यावरूनही विरोधकांना राज्य सरकारला जाब विचारत टीका सुरू केली आहे. राष्ट्रवादी काँग्रसे पार्टी -शरदचंद्र पवार पक्षाच्या आमदार रोहित पवार यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनस्थळी जाऊन त्यांची भेट घेतली.रोहित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला

रोहित पवार(Rohit Pawar) म्हणाले, 'खरं तर हा विषय खूप पूर्वीचा असून विद्यार्थ्यांनी आपापल्या पद्धतीने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच विविध नेते मंडळी यांना भेटून त्यांचं म्हणणं मांडल आहे. आता परीक्षेचं पॅटर्न हा बदलणार आहे. आणि राज्य सेवेची जी परीक्षा आहे. त्यात कृषी सेवेचं देखील समावेश व्हावा ही पूर्वीची मागणी असून याबाबत मुख्यमंत्र्यांना भेटून त्यांना सांगण्यात देखील आलं होतं आणि मुख्यमंत्री कार्यालयातून तसं पत्र आयोगाला पाठविणे देखील आले होते मात्र या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली नाही. इतर नेते मंडळींनी देखील याबाबत पाठपुरावा केला नाही.'

तसेच 'त्यामुळे हा लढा पूर्णपणे विद्यार्थ्यांचा असून आम्ही राजकारण आणत नाही आहोत. सरकारच्या आणि सरकारमधील लोकांच्या फायद्याचे असलेले निर्णय एका दिवसामध्ये होतात, मात्र विद्यार्थ्यांच्या भविष्यातील निगडित असलेल्या विषयांबाबत सरकार चालढकल करत आहे. जो पर्यंत सरकार तसेच आयोग सकारात्मक निर्णय घेत नाही तो पर्यंत मी देखील रात्रभर इथच थांबणार असल्याचंही रोहित पवार यांनी सांगितलं.

याशिवाय सरकारकडून आज याबाबत बैठक घेण्यात आली मात्र या बैठकीनंतर कोणताही निर्णय न घेता निर्णय उद्यावर ढकलण्यात आला आहे, मात्र सरकारने आजच्या आज तातडीने हा निर्णय घ्यावा. बांगलादेशमध्ये विद्यार्थ्यांनी भूमिका घेऊन आंदोलन केलं त्यानंतर काय झालं हे सर्वांनीच पाहिलं आहे. त्यामुळे राज्य सरकारने विद्यार्थ्यांना लाईटली घेऊ नये. राजकीय आंदोलन नसून हे विद्यार्थ्यांचा आंदोलन आहे. आंदोलन जर वाढत गेलं तर ते सरकारला परवडणार नाही.' मग सरकारने आजच निर्णय घ्यावा. अशी मागणी रोहित पवार यांनी केली.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT