Supriya Sule News : 'महाविकास आघाडीच्या आगामी सरकारमध्ये पुण्यातील काहीजण मंत्रिपदावर..' ; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान!

Supriya Sule on Mahavikas Aghadi Government : आगामी विधानसभा लढवण्यास इच्छुक असलेल्यांना आता अधिकच हुरूप चढला; जाणून घ्या, सुप्रिया सुळे आणखी काय म्हणाल्या आहेत?
Supriya Sule
Supriya SuleSarkarnama
Published on
Updated on

Pune Mahavikas Aghadi leaders and VidhanSabha Election : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात चांगले यश मिळाल्यानंतर आगामी विधानसभा निवडणुका देखील आपण बहुमताने जिंकू असा विश्वास महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये दिसत आहे. विधानसभा निवडणुकांसाठी जागा वाटपाच्या चर्चा सध्या महाविकास आघाडीमध्ये सुरू आहेत.

तर पुण्यामधून महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आणि शिवसेना ठाकरे गटामधून मोठ्या प्रमाणात इच्छुक पाहायला मिळत आहेत. या इच्छुकांमध्ये तिकीट मिळवण्यासाठी चढाओढ सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे(Supriya Sule) यांनी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार असल्याचा विश्वास व्यक्त करत, पुण्यातील काही नेते मंत्री झालेले दिसतीलं असं विधान केलं आहे. यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये आता अधिकच उत्साही वातावरण बघायला मिळत आहे.

Supriya Sule
Video Supriya Sule : 'सरकारने मला फाशीची शिक्षा द्यावी!' असं का म्हणाल्या सुप्रिया सुळे ?

पुणे महापालिकेच्या राजीव गांधी ई लर्निंग स्कूलच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला खासदार सुप्रिया सुळे यांनी आज(बुधवारी) उपस्थिती लावली. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना सुप्रिया सुळे म्हणाल्या. 'बदलापूर मध्ये जी घटना घडली त्याचा आपण जाहीर निषेध केला पाहिजे. या घटनेबाबत सर्वांनी संवेदनशीलपणे बोलणे आवश्यक आहे. सध्या राज्यामध्ये ज्या घडामोडी घडत आहेत, त्या अत्यंत चिंताजनक आहेत. त्यामुळे विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना तंत्रज्ञानबरोबार गुड टच बॅड टच याबाबतचे मार्गदर्शन होणे आवश्यक आहे.

तसेच 'हा सामाजिक प्रश्न असून प्रत्येकवेळी सरकार दोषी असेल असे म्हणता येणार नाही. पण सत्तेत असलेल्या लोकांनि नैतिकता दाखवायला हवी मात्र ते आम्हाला नेहमी नैतिकता शिकवतात.' असा टोला सुप्रिया सुळे यांनी सरकारला लगावला.

Supriya Sule
Supriya Sule: सुप्रिया सुळे यांचे फडणवीसांना पत्र; तातडीने निर्णय घेण्याची केली विनंती

सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या, 'गेल्या दीड वर्षात पुण्याची जी बदनामी झाली ती पुसून टाकण्यासाची जबाबदारी आपल्यावर असणार आहे. राज्याला गृहमंत्री नसल्यासारखं चित्र पाहायला मिळत आहे. आपले गृहमंत्री कायम दिल्लीला असतात त्यामुळे कारभार कोण पाहाते माहीत नाही. पण हे जास्त दिवस आपल्याला सहन करायचं नाही 2-3 महिन्यात हे बदलेल .' असं म्हणत आगामी काळात महाविकास आघाडीचे(Mahavikas Aghadi ) सरकार येणार असल्याचा विश्वास सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला.

पुढे सुळे यांनी मंचावर बसलेल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांकडे कटाक्ष टाकत आगामी महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये यातील काही मंत्री असतील, अशी घोषणाच केली. यामुळे मंचावरती उपस्थित असलेले आणि आगामी विधानसभा लढवण्यास इच्छुक असलेल्या आबा बागुल, अरविंद शिंदे(Arvind Shinde), रमेश बागवे आणि प्रशांत जगताप यांच्या चेहऱ्यावर हास्यछटा उमटल्याचं पाहायला मिळालं.

त्यामुळे मंचावरील नेमकं कोणाला विधानसभेचे तिकीट महाविकास आघाडीकडून मिळणार? यातील कोण निवडून येणार? राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार का? आणि कोणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

(Edited by- Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com