Ramdas Athavale
Ramdas Athavale Sarkarnama
पुणे

भीमा कोरेगावच्या दंगलीत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सहभागी होते...

उत्तम कुटे: सरकारनामा

पिंपरी : राष्ट्रवादी कॉंग्रेस (NCP) ही जातीपातीचे राजकारण करते आहे. तिच्या जन्मानंतर राज्यात जातीपातीचे राजकारण मोठ्या प्रमाणात सुरु झाले. त्यामधून समाजात फूट पाडली जात आहे, असा घणाघाती आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी कालच्या (ता.२) मुंबईतील गुढीपाडव्याच्या मेळाव्यात केला होता. त्याला केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athavale) यांनी काल (ता.३ एप्रिल) पिंपरी-चिंचवडमध्ये (Pimpri-Chinchwad) दुजोरा दिला. राष्ट्रवादीतील खालचे नेते आणि कार्यकर्ते हे जातीय राजकारण करीत असल्याचे त्यांनी सांगितले. तर भीमा कोरेगावच्या दंगलीत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सहभागी होते, असा गंभीर आरोपही राष्ट्रवादीवर केला आहे.

आठवले यांनी कोरेगाव भीमा येथे उसळलेल्या जातीय दंगलीमध्ये राष्ट्रवादीचा हात असल्याचा खळबळजनक दावा केला आहे. मात्र, तसा आदेश शरद पवारसाहेबांनी दिला असं मला म्हणायचं नाही, असेही त्यांनी हा आरोप करताना स्पष्ट केले. पण, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा या दंगलीत हात होता,अशी माहिती आमच्याकडे आहे, असे ते म्हणाले. कोरेगाव भीमा परिसरातील बहूतांश सरपंच हे राष्ट्रवादीचे होते, याकडे त्यांनी लक्ष वेधले. आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पक्षाच्या (आरपीआय) संकल्प मेळाव्यासाठी ते शहरात आले होते. त्यापूर्वी मिडियाशी बोलतांना त्यांनी राष्ट्रवादीवर ही तोफ डागली.

शिवाजी पार्क, दादर (पश्चिम) येथील कालच्याच गुढीपाडवा मेळाव्यात मशिदीतील भोंग्यासमोर हनुमान चालीसा ही भोंग्यावर वाजवण्याचा आदेश राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिला होता. मात्र, त्याच्याशी आठवले असहमत दिसले. मशिदींसमोर हिंदूचे भोंगे असू नयेत,असे ते म्हणाले. त्याचवेळी हिंदूनाही भोंगे वाजविण्याचा अधिकार आहे, हे ही त्यांनी स्पष्ट केले. पण, ते मशिदीच्या विरुद्ध दिशेला असावेत, मंदिरात असावेत, असे ते म्हणाले. भोंगे परंपरांगत वाजत आहेत, असे सांगत पूर्वी ते लवकर उठण्यासाठी वाजत होते, असे आठवले यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT