Ramdas Athawale News Sarkarnama
पुणे

RPI-BJP News : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीतही 'आरपीआय'ची भाजपशी युती, पण फायदा किती?

Ramdas Athawale Delhi meeting : शिर्डीच्या जागेवर अगोदरच दावा केल्याने आता दुसरी कोणती जागा आरपीआय मागणार याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

उत्तम कुटे: सरकारनामा

Ramdas Athawale News : अगामी लोकसभा निवडणुकीत शिर्डी मतदारसंघावर 'आरपीआय' (आठवले गट) चे अध्यक्ष, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी अगोदरच दावा ठोकला आहे. त्यामुळे या जागेसह आणखी एका जागेची मागणी त्यांचा पक्ष भाजपकडे करणार आहे. तसा ठरावच पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या दिल्ली येथील मंगळवारच्या (ता.८) बैठकीत मंजूर करण्यात आला.

शिर्डीच्या जागेवर अगोदरच दावा केल्याने आता दुसरी कोणती जागा आरपीआय मागणार याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. दरम्यान, या वर्षअखेर लोकसभेपूर्वी होऊ घातलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपसोबत (BJP) युती करण्याचा दुसरा ठरावही दिल्लीतील आरपीआयच्या बैठकीत करण्यात आला. मात्र, महाराष्ट्र (Maharashtra) बेस असलेल्या आरपीआय पक्षाचा सध्या राज्यात एकही खासदार वा आमदार निवडून आलेला नाही. स्वत आठवले हे राज्यसभेचे सदस्य आहेत.

त्यामुळे त्यांच्या युतीचा राजस्थान, मध्यप्रदेश, तेलंगणा, मिझोराम आणि छत्तीसगड या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत किती फायदा भाजपला होईल, याविषयी राजकीय जाणकार साशंक आहेत. मात्र, लोकसभेची लिटमस टेस्ट साबित होणाऱ्या या पाच राज्यांच्या निवडणुकीत भाजपला कसलीही रिस्क घ्यायची नाही आहे. त्यामुळे त्यासाठी जमेल त्याच्याशी ते जमवून घेणारच आहेत. त्यातूनच त्यांनी महाराष्ट्रात राष्ट्रवादी कॉंग्रेस गेल्या महिन्यात फोडून अजित पवारांची रसद घेतली आहे.

दुसरीकडे नागालॅंडच्या निवडणुकीत पक्षाच्या गन्नाधारी शेतकरी या निवडणूक चिन्हावर दोन आमदार निवडून आल्याने आरपीआयचा उत्साह व त्यातून त्यांची बार्गेनिंग पॉवर वाढली आहे. त्यामुळेच त्यांनी लोकसभेसाठी महाराष्ट्रातील ४८ पैकी दोन जागांची मागणी केली आहे. तर, देशभरातील सर्व राज्यांत भाजपने आरपीआयला जागा वाटपात सोबत घ्यावे, ज्या राज्यात त्यांची सत्ता आहे, तिथे पक्षाला सत्तेत वाटा द्यावा, अशी मागणी ठराव करून केली आहे. त्यामुळे त्यानंतर पाच महिन्यांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीला ते किती जागा मागतात, याकडेही आताच लक्ष लागले आहे.

28 राज्ये आणि 8 केंद्रशासित प्रदेशांचे अध्यक्ष, प्रतिनिधी दिल्लीतील बैठकीला उपस्थित होते. खाजगी क्षेत्रात अनुसूचित जाती जमातीसह इतर मागासवर्गीयांसाठी आरक्षण लागू करणारा कायदा करण्यात यावा. तसेच पदोन्नतीमध्ये आरक्षणाचा कायदा संसदेत मंजूर करावा असे ठराव या बैठकीत आले. तसेच पक्षाचे देशात 25 करोड सदस्य येत्या 6 महिन्यात करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले, राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर, राष्ट्रीय संघटन सचिव भुपेश थुलकर, महाराष्ट्र राज्य सरचिटणीस गौतम सोनवणे, मुंबई अध्यक्ष सिध्दार्थ कासारे, महिला आघाडीच्या सीमा रामदास आठवले, अॅड. आशा लांडगे तसेच अनिल गांगुर्डे, अॅड मंदार जोशी आदी या बैठकीला उपस्थित होते.

Edited by : Amol Jaybhaye

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT