Pune News: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा चित्र आता स्पष्ट झाल्यानंतर प्रचाराच्या धामधुमीला सुरुवात झाली आहे. अशातच महायुतीची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. कारण भाजपचा मित्र पक्ष असलेल्या आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी महायुतीला मतदान न करण्याची शपथ घेतली आहे.
सध्या पुण्यातील आरपीआयचे (RPI) कार्यकर्ते महायुतीत आरपीआयला सन्मानाची वागणूक दिली जात नसल्याने नाराज झाले आहेत. आरपीआयचे पदाधिकारी आणि उपमहापौर सिद्धार्थ धेंडे यांनी ही नाराजी पुढे करत पक्षाकडे आपला राजीनामा देखील सोपवला आहे. मात्र पक्षाने त्यांचा राजीनामा अद्याप स्वीकारलेला नाही. सिद्धार्थ धेंडे यांनी आरपीआयच्या पदाधिकाऱ्यांसोबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर महायुतीतील उमेदवारांना मतदान न करण्याची शपथ घेतली आहे.
पुणे शहराचा विचार केल्यास वडगाव शेरी पर्वती शिवाजीनगर आणि पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात आरपीआयला मानणारा वर्ग आहे. आरपीआयने घेतलेल्या या निर्णयाचा या मतदारसंघात महायुतीला फटका बसण्याची शक्यता आहे.
याबाबत धेंडे म्हणाले, मी आंबेडकरी चळवळीचा कार्यकर्ता म्हणून केंद्रीयमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांच्या आरपीआय पक्षामध्ये गेली २७ वर्ष कार्य करत आहे. आंबेडकरी विचारांचा प्रचार व प्रसार करणे. तसेच राजकीय पदाचा उपयोग करून समाजाला न्याय देण्याच्या कामात पुढाकार घेतला आहे. पक्षाच्या धोरणानुसार विविध राजकीय भूमिकेला नेहमीच समर्थन दिलेले आहे. परंतु गेल्या काही महिन्यांपासून आरपीआयला महायुतीकडून सन्मानाची वागणूक दिली जात नाही.
तसेच, 'नुकत्याचा पार पडलेल्या लोकसभा निवडणूकीतही ही जागा महायुतीने आपल्या पक्षाला दिलेली नाही. या विधानसभेमध्ये पक्षाला स्वतंत्र निवडणूक चिन्ह असून देखील आपले प्रतिनिधीत्व द्यायला महायुती मधील भाजप (BJP), शिवसेना व राष्ट्रवादी हे देखील तयार नाहीत . राज्यभरातून एक जागा दिली आहे, त्या ठिकाणी देखील आरपीआयला कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता भाजपाने आपलाच उमेदवार दिला आहे. त्यामुळे आम्ही महायुतीला मतदान न करण्याचा निर्णय घेतला असून त्याप्रमाणे आज शपथ घेतली आहे.' असं धेंडे यांनी सांगितलं आहे.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.