Kolhapur News: विधानसभा निवडणुकीच्या अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी कोल्हापूर उत्तर काँग्रेसमध्ये भूकंप झाला. तर राधानगरी-भुदरगड विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीमध्ये बंडखोरी झाली. महायुतीमध्ये चंदगड आणि इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात बंडाचे निशाण फडकले आहे.
कोल्हापूर दक्षिण, उत्तर, कागलसह शाहूवाडीत या मतदार संघात दुरंगी लढत, तर करवीर,हातकणंगले, इचलकरंजी, राधानगरी, चंदगड व शिरोळमध्ये तिरंगी लढतीचे चित्र स्पष्ट झाले.
करवीर विधानसभा मतदारसंघात काँग्रेस (Congress) आणि शिवसेनेत फाईट होत असताना महायुतीतील घटक पक्ष असलेल्या जनसुराज्य शक्तीने संताजी घोरपडे यांना उमेदवारी दिली आहे. करवीर मधील तिरंगी लढतीने महायुती मधील बेबनाव स्पष्ट झाला आहे. महायुतीत जनसुराज्यला दोनच जागा अधिकृतरित्या दिल्याने करवीर आणि चंदगड मध्ये 'जनसुराज्य'ने बंडखोरी केली आहे.
हातकणंगले विधानसभा मतदारसंघात 'जनसुराज्य'चे अशोकराव माने, काँग्रेसकडून राजूबाबा आवळे, 'स्वाभिमानी'कडून माजी आमदार सुजित मिंनचेकर हे निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून स्वाभिमानीत गेलेले माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांनी निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतल्यानंतर महाविकास आघाडीला धक्का बसला आहे. त्यामुळे या मतदारसंघात तिरंगी लढत होईल.
शिरोळ विधानसभा मतदारसंघात दुरंगी लढत होत असताना 'स्वाभिमानी'कडून उद्धव ठाकरेंचा माजी आमदार फोडून उल्हास पाटलांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले. ऐनवेळी दुरंगी लढत ही तिरंगीत बदलल्याने महायुतीकडून राजेंद्र पाटील यड्रावकर, महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे गणपतराव पाटील आणि 'स्वाभिमानी'कडून उल्हास पाटील अशी तिरंगी लढत होणार आहे. चंदगडमध्ये महायुतीत भाजपचे नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे निकटवर्तीय शिवाजी पाटील व काँग्रेसकडून इच्छुक अप्पी पाटील यांनी बंडखोरी केली आहे. त्या ठिकाणी महायुतीकडून राष्ट्रवादीचे आमदार राजेश पाटील, तर महाविकासकडून डॉ. नंदिनी बाभूळकर रिंगणात आहेत.
राधनगरीतून महाविकास आघाडीची उमेदवारी नाकारल्यानंतर जिल्हा बँकेचे संचालक ए वाय पाटील यांनी देखील बंड केले आहे. महाविकास आघाडीच्या विरोधात त्यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या दोन टर्म ए वाय पाटील यांनी माघार घेतली होती. मात्र यंदा कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवण्यासाठी ते सज्ज झाले. या मतदारसंघात महायुतीकडून प्रकाश आबिटकर, उद्धव ठाकरेंकडून के पी पाटील आणि अपक्ष ए वाय पाटील, हे निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत.
कोल्हापूर दक्षिण - काँग्रेसचे आमदार ऋतुराज पाटील विरुद्ध भाजपचे माजी आमदार अमल महाडिक
कोल्हापूर उत्तर - शिंदे सेनेचे माजी आमदार राजेश क्षीरसागर विरुद्ध राजेश लाटकर (काँग्रेसचा पाठिंबा शक्य)
इचलकरंजी - भाजपचे राहुल आवाडे विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गटाचे मदन कारंडे
शाहूवाडी - ‘जनसुराज्य’चे आमदार डॉ. विनय कोरे विरुद्ध ठाकरे सेनेचे माजी आमदार सत्यजित पाटील-सरूडकर
कागल - राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे पालकमंत्री हसन मुश्रीफ विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे समरजितसिंह घाटगे
हातकणंगले - काँग्रेसचे आमदार राजू आवळे, शिवसेना शिंदे गटाचे अशोकराव माने, स्वाभिमानीचे माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर
शिरोळ -महायुतीचे आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, काँग्रेसचे गणपतराव पाटील, ‘स्वाभिमानी चे माजी आमदार उल्हास पाटील
करवीर - शिंदे सेनेचे माजी आमदार चंद्रदीप नरके विरुद्ध काँग्रेसचे राहुल पाटील, ‘जनसुराज्य’चे संताजी घोरपडे
चंदगड - अजित पवार पक्षाचे आमदार राजेश पाटील विरुद्ध राष्ट्रवादी शरद पक्षाच्या डॉ. नंदिनी बाभूळकर, भाजप बंडखोर शिवाजी पाटील, काँग्रेस बंडखोर अप्पी पाटील, ‘जनसुराज्य’चे मानसिंगराव खोराटे
राधानगरी - शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रकाश आबिटकर विरुद्ध ठाकरे सेनेचे माजी आमदार के. पी. पाटील, काँग्रेस बंडखोर ए. वाय. पाटील
(Ediyted by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.