Ayodhya Ram Mandir Sunil Deodhar Sarkarnama
पुणे

Sunil Deodhar: रामाशी पंगा घेऊ नका..; सुनील देवधरांचा रोख कुणाकडे? राम त्यांना...

Chaitanya Machale

Pune News : अयोध्या येथे उभारण्यात आलेल्या राम मंदिरात श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. 22 जानेवारीला हा समारंभ होणार असून जगभरातील रामभक्त उपस्थित राहणार आहेत. हा दिवस देशभरात दिवाळी म्हणून साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

राम मंदिर उभारणीमध्ये अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिलेली असून त्यांनी दिलेल्या लढ्यामुळे अयोध्येत हे मंदिर उभे राहत आहे. मात्र देशात सत्ताधारी असलेला भारतीय जनता पक्ष राम मंदिर उभारणीचा वापर मतांचे राजकारण करण्यासाठी करीत आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांनी या कार्यक्रमासाठी न जाण्याचा निर्णय घेतला आहे. तर राम मंदिराच्या उद्घाटनावरून शंकराचार्य यांनी नाराजी व्यक्त करत शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी या सोहळ्याचं आयोजन शास्त्रानुसार केलेले नाही, असे म्हटलं होते. या सोहळ्यासाठी जाणार नसल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी संघ प्रचारक सुनील देवधर यांनी 22 जानेवारीला अयोध्या येथे होणाऱ्या श्री रामाच्या प्रतिष्ठापना सोहळ्याचे औचित्य साधून 20 आणि 21 जानेवारीला विविध कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याचे सांगितले.

देवधर यांना शंकराचार्य यांनी सोहळ्यावर टाकलेल्या बहिष्काराबाबत विचारले असता, ते म्हणाले 'रामाशी कोणी पंगा घेऊ नये', ज्यांनी ज्यांनी यापूर्वी रामाशी पंगा घेतला, त्यांना त्यांना रामाने धडा शिकवला आहे. शंकराचार्य यांनी नक्की कोणते विधान केले, मला माहित नाही. सर्वांनाच लोकशाहीमध्ये बोलण्याचा अधिकार आहे. श्रीरामाच्या मंदिराला कोणी जावं, कुणी जाऊ नये, हा ज्याचा त्याचा अधिकार आहे, असेही देवधर म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राम मंदिरात प्रतिष्ठापनेनिमित्त दोन दिवस विश्व हिंदू परिषद आणि संस्कार भारती कडून 'रंगीले राम' या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले आहे. यात रामायणातील सात मुख्य प्रसंग मोठ्या चित्राकृतीतून दाखवण्यात येणार असून 300 किलोची रांगोळीसुद्धा साकारली जाणार आहे. प्रभू श्रीरामाची 100 फूट भव्य रांगोळी, रामचरित्रावर अखंड गायन,भजन, नृत्य याचे सादरीकरण, श्री रामायणावरील 125 चित्रांचे प्रदर्शन, प्राचीन शस्त्र आणि श्रीराम मंदिर प्रतिकृती-पुस्तके-गौ साहित्याचे प्रदर्शन तसेच श्रीराम खिचडी प्रसाद वाटप केले जाणार आहे. तसेच या निमित्त प्रभू श्रीरामाची 700 स्क्वेअर फूट आकारातील भव्य रांगोळी काढली जाणार आहे. संस्कार भारती आणि श्रीरंग कलादर्पणचे कलाकार ही रांगोळी साकारणार आहेत, असेही देवधर यांनी स्पष्ट केले.

Edited by: Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT