Dombivli: कार्यकर्त्यांचे 'राजकीय' पोळीभाजी केंद्र; वाहनांवर झळकले नेत्यांचे फोटो; कारवाई कधी?

Dombivli Railway Station: कारवाई करण्यास अधिकारी घाबरतात.
Dombivli Railway Station
Dombivli Railway StationSarkarnama

Dombivli Political News: निवडणुकीचे वारे वाहू लागलेले असतानाच कल्याण डोंबिवलीत नेत्यांचे फोटो लावून रस्त्यावर व्यवसाय सुरू करण्याचा प्रकार सुरू झाल्याचे सर्वत्र दिसते. नेत्यांचा फोटो लावला की महापालिका कर्मचारी देखील दबावाखाली राहतात आणि अतिक्रमण विभागातूनही कोणतीही कारवाई केली जात नाही.

त्यामुळे सध्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर असे हौशी कार्यकर्ते सक्रिय झाले आहेत. डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानकाजवळ एका टेम्पोत पोळी भाजी विक्रीचे सामान ठेऊन ही गाडी रेल्वे स्थानकाजवळील रस्त्यावर उभी करून ठेवली आहे. या गाडीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या प्रतिमा लावल्या आहेत.

वाहतूक कोंडीची समस्या...

या फिरत्या पोळी भाजी केंद्राच्या वाहनाच्या दर्शनी भागात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, डोंबिवली शिवसेना शहरप्रमुख राजेश मोरे, कल्याण ग्रामीण शहरप्रमुख महेश पाटील यांच्याही प्रतिमा लावण्यात आल्या आहेत. हे पोळी भाजीचे वाहन मागील काही दिवसांपासून डोंबिवली पूर्व रेल्वेस्थानकाजवळील स्कायवॉक खालील रस्त्यावर आणून उभे केले जाते.

या रस्त्यांवरून रिक्षा, दुचाकी, इतर खासगी वाहने धावत असतात. त्यांना या राजकीय मंडळींच्या प्रतिमा लावून उभ्या केलेल्या वाहनाचा अडथळा होत आहे. या वाहनाच्या माध्यमातून ग्राहकांना पोळी भाजीची विक्री केली जात आहे. काही नागरिकांनी या वाहनाविषयी पालिकेत तक्रारी केल्या आहेत. या वाहनावरील राजकीय प्रतिमा पाहून या वाहनावर कारवाई कशी करायची, असा प्रश्न अधिकाऱ्यांना पडला आहे.

नेत्यांचे फोटो असलेली वडा पावची गाडी...

दोन महिन्यांपूर्वी देखील एक वडा पावची गाडी असेच फोटो लावून रस्त्यावर उभी केली होती. यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणत ट्रॅफिक झाले होते. नेत्यांचे फोटो असल्याने अधिकारी कारवाई करण्यास घाबरले होते. परंतु त्यानंतर आजूबाजूच्या व्यावसायिकांनी देखील या वडापावच्या गाडीवर आक्षेप घेतला होता. इतकेच नव्हे तर काही व्यावसायिक न्यायालयात देखील जाण्यास तयार होते.

नेत्यांचे फोटो लावलेली पोळी भाजीची गाडी...

हे प्रकरण थंडावल्यानंतर आता डोंबिवली पूर्वेत रेल्वेस्थानक भागात राजकीय पोळीभाजी केंद सुरू करण्यात आल्याने या रस्त्यावरून ये-जा करणारे प्रवासी, पादचारी नाराजी व्यक्त करीत आहेत. या वाहनाला रेल्वेस्थानकाजवळील वर्दळीच्या रस्त्यावर उभे राहण्यास मज्जाव करण्याची मागणी नागरिक, व्यापारी करत आहेत. पालिका अधिकारी राजकीय दबावामुळे याविषयावर बोलण्यास तयार नाहीत.

Edited by: Mangesh Mahale

Dombivli Railway Station
Mayawati: BSP स्वतंत्र लढणार...; पुतण्या आकाश आनंद यांच्यासाठी मायावतींनी मांडला डाव

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com