Pune MNS News
Pune MNS News Sarkarnama
पुणे

Amit Thackeray Birthday News: अमित ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त अनोखा उपक्रम; युवक-युवतींची उडाली झुंबड

सरकारनामा ब्यूरो

Pune News: मनसे नेते अमित ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्त राज्यभरात विविध ठिकाणी मनसैनिक वेगवेगळे उपक्रम राबवून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत.

अमित ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे मनसे विद्यार्थी सेनेच्यावतीनेही एक अनोखा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाची पुण्यात एकच चर्चा रंगली आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेकडून पुणेकरांसाठी 31 रुपये स्वस्त दराने पेट्रोल देण्यात आलं आहे. पुणे शहरातील अनेक पेट्रोल पंपावर मनसेच्या विद्यार्थी सेनेतर्फे 31 रुपये कमी दराने पेट्रोलचे वाटप करण्यात आले.

मनसेच्या विद्यार्थी सेनेचे अमोल मारूती शिंदे यांच्यावतीने हा उपक्रम महाविद्यालयीन युवक-युवतीसांठी आज (दि.24 मे) राबविण्यात आला. या उपक्रमाचा अनेक युवक-युवतींनी लाभ घेतला.

31 रुपये स्वस्त दराने पेट्रोलच्या उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेकडून पुणेकरांसाठी खास कूपनची व्यवस्था करण्यात आली होती. पुणे शहरातील अनेक पेट्रोल पंपावर मनसेतर्फे हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी अनेक युवक-युवतींची झुंबड उडाली होती.

Edited by : Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT