Devendra Fadnavis News:
Devendra Fadnavis News: Sarkarnama

Devendra Fadnavis News: 'सिबिल स्कोअर' मागणाऱ्या बँकांवर गुन्हे दाखल करा; फडणवीसांच्या आदेशाने बँकांचे धाबे दणाणले

Farmer CIBIL Score : "बँकांनी शेतकऱ्यांना कर्जाच्या स्वरुपात मदत करणं अपेक्षित आहे.."

Mumbai : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्यस्तरीय खरीप हंगाम आढावा बैठक पार पडली आहे. यावेळी शेतकऱ्यांना येणाऱ्या वेगवेगळ्या अडचणी संदर्भात चर्चा झाली. याबरोबरच 'सिबिल स्कोअर'चं कारण सांगून शेतकऱ्यांना कर्ज नाकारणाऱ्या बँकांवर कारवाई करण्याचा इशारा फडणवीसांनी दिला आहे.

फडणवीस म्हणाले, "'सिबिल स्कोअर' चांगला नाही म्हणून शेतकऱ्यांना बँकेने कर्ज नाकारले तर त्या बँकांवर तत्काळ गुन्हे दाखल करा", असे थेट आदेशच फडणवीसांनी दिले. त्यांच्या या आदेशामुळे बँकांचे धाबे दणाणले आहेत.

Devendra Fadnavis News:
Bachchu Kadu News : गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या बच्चू कडूंना मंत्रिपद मिळणार; पण एका दिवसापुरते !

"बँकांनी शेतकऱ्यांना कर्जाच्या स्वरुपात मदत करणं अपेक्षित आहे. मात्र, ज्या बँका शेतकऱ्यांना कर्ज देणार नाहीत, त्या बँकांवर तत्काळ कारवाई करणं गरजेचं आहे. शेतकऱ्यांना कर्ज देण्यास टाळाटाळ केल्यास गुन्हा दाखल करा, त्या बँकेवर कारवाई करण्यात येईल", असं फडणवीस म्हणाले.

Devendra Fadnavis News:
Pune Municipal Corporation: पुणे महापालिकेला अडीच वर्षापासून मिळेना नगरसचिव; प्रोटोकॉल अधिकाऱ्यावर सोपवली अतिरिक्त जबाबदारी

दरम्यान, जलयुक्त शिवार योजनेच्या दुसऱ्या टप्प्याबाबत आजच्या बैठकीत चर्चा झाली. आता जलयुक्त शिवारच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात करण्यात येणार असून जास्तीत जास्त क्षेत्र सिंचनाखाली आणण्याचा प्रयत्न असल्याचं यावेळी फडणवीस म्हणाले.

याबरोबरच शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळवण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. शेतकऱ्यांना 12 तास वीज देण्यासाठी सोलर योजनेचा देखील फायदा होणार आहे, असंही फडणवीसांनी सांगितलं.

Edited by : Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com