Rupali Chakankar Resignation Maharashtra Womens Commission Sarkarnama
पुणे

Rupali Chakankar News: महापालिका निवडणुकीत पराभव ते महिला आयोगाच्या अध्यक्षा; अशी आहे रुपाली चाकणकरांची राजकीय कुंडली

Rupali Chakankar Resignation Maharashtra Womens Commission: अशोक खरात प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर रुपाली चाकणकर यांनी महाराष्ट्र महिला आयोगाचा राजीनामा दिला. त्यांच्या राजकीय प्रवास जाणून घ्या.

Mangesh Mahale

Rupali Chakankar Political Journey: गेल्या काही दिवसांपासून लिंगपिसाट कॅप्टन अशोक खरात याच्या कारनाम्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला आहे.अशोक खरात प्रकरण अंगलट आल्यानंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

अशोक खरात याच्याशी असलेली विशेष जवळीक, आणि त्याच्या मंदिराच्या ट्रस्टवर चाकणकर या सदस्य असल्याने त्या खरात यांच्या निकटवर्तीय असल्याचे उघड झाले होते. त्यामुळे खरात प्रकरण चर्चेत आल्यानंतर चाकणकर यांच्या राजीनाम्यासाठी विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना सळो की पळो करुन सोडले.

या प्रकरणात रूपाली चाकणकर या अशोक खरातचे पाय धुताना आणि त्याच्या डोक्यावर छत्री धरताना दिसणारे फोटो आणि व्हिडिओ पाच दिवसापासून समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षच ट्रस्टवर असल्याने खरातने महिलांना फसवणूक करुन त्यांच्यावर अत्याचार केल्याचा आरोप करण्यात येत आहे. याचे काही व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना राजीनामा देण्याचे सांगितले. त्यानंतर चाकणकर यांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे राजीनामा सूपूर्त केला.

लग्नानंतर राजकारणात एन्ट्री

शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या रुपाली चाकणकर यांचा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदापर्यंतचा प्रवास करा झाला, त्यांची राजकारणात एन्ट्री कशी झाली हे जाणून घेऊया! मूळच्या दौंडच्या असलेल्या रुपाली चाकणकर यांचे शिक्षण हडपसर येथील रयत शिक्षण संस्थेच्या साधना महाविद्यालयातून झाले आहे. लग्नानंतर त्यांचा राजकारणात एन्ट्री झाली.

महिला सक्षमीकरण

2002 मध्ये पुणे महानगरपालिका निवडणुकीत त्यांच्या सासु रुक्मिणी चाकणकर या निवडून आल्या. पुणे शहर आणि परिसरात सामाजिक काम करीत असताना रुपाली चाकणकर यांनी महिला सक्षमीकरण कार्यक्रमात त्या सक्रिय होत्या.

'स्वच्छंदी भरारी अभियान'

2007 मध्ये त्यांनी पुण्यातील बचत गटाच्या महिलांसाठी काम करण्यास सुरवात केली. या कामाची पोच पावती म्हणून त्यांना पुरस्कारने गौरविण्यात आले होते. वर्षभरानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून खडकवासला विधानसभा मतदार संघाच्या अध्यक्षपदावर त्यांची नियुक्ती करण्यात आली. 'स्वच्छंदी भरारी अभियान' त्यांनी यशस्वीपणे राबवले. त्यानंतर त्यांना पुणे शहराच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला शहराध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिलं.

चित्रा वाघ यांच्या जागी नियुक्ती

२०१२ मध्ये झालेल्या पुणे महापालिका निवडणुकीत रूपाली चाकणकर यांचा युगंधरा चाकणकर यांनी पराभव केला होता. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तत्कालीन महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी २०१९ मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला, त्यानंतर ऑक्टोबर 2021 मध्ये रूपाली चाकणकर यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी वर्णी लागली. त्या राज्याच्या राजकारण सक्रिय झाल्या.

राजीनामा दिला नसता तर...

राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी होण्यापूर्वी त्यांना पुणे शहराध्यक्ष पदावरून तडकाफडकी बाजूला केले होते. त्याचे नेमकं कारण समजू शकले नाही. मात्र त्यानंतर काही दिवसातच त्यांनी महिला प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली. त्यानंतर 2024 मध्ये पुन्हा आयोगाच्या अध्यक्ष पदावर त्यांना संधी देण्यात आली होती.राजीनामा दिला नसता तर त्या २०२७ पर्यंत या महत्त्वाच्या पदावर कायम राहिल्या असत्या.

छगन भुजबळ म्हणतात...

सध्या त्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) च्या महिला प्रदेशाध्यक्षा म्हणूनही कार्यरत आहेत. या पदाचाही त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी पक्षातील एका गोटातून होत असल्याची माहिती आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी याबाबत पक्ष निर्णय घेईल, असे माध्यमांना सांगितले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT