Rupali Chakankar, Supriya Sule Sarkarnama
पुणे

Rupali Chakankar Vs Supriya Sule : दादांचा पेपर कॉपी करून ताई पास; रुपाली चाकणकरांचा सुप्रिया सुळेंना टोला

Sharad Pawar Vs Ajit Pawar : महाविकास आघाडीत सर्व एकत्रच, पण बारामती लोकसभेबाबत आताचा आलेल्या नेत्यांनी केलेली विधाने ही बालीशपणाची

Sudesh Mitkar

Pune Political News : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामती मतदारसंघातील विकास कामावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि अजित पवार गट भिडताना पाहायला मिळत आहेत. बारामतीतील विकास हा आपल्याच नेत्यांनी केल्याचे पटवून देण्यासाठी दोन्ही गट जीवाचं रान करत आहेत. या दावे-प्रतिदाव्यातून रुपाली चाकणकरांनी खासदार सुप्रिया सुळेंना खोचक टोला लगावला आहे. दादांचा पेपर कॉपी करून ताई पास झाल्याची टीका चाकणकरांनी केली आहे. (Sharad Pawar Vs Ajit Pawar)

पुणे महामालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या 34 गावांच्या विकासकामे आणि मिळकत करासह इतर समस्यांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीमध्ये रविवारी बैठक पार पडली. यानंतर चाकणकरांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत सुळेंवर टीका केली. रुपाली चाकणकर म्हणाल्या, बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यासोबत पंधरा वर्षे काम करत आहे. बारामतीतील जनता ही विकासकामांच्या पाठीमागे सातत्याने उभे राहत आलेली आहे. पंधरा वर्षांमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलेल्या विकासकामांचा पेपर कॉपी करूनच सुप्रिया सुळे पास झाल्याचा टोला चाकणकरांनी लगावला.

अजित पवारांनी बारामतीमध्ये झालेल्या नमो रोजगार मेळाव्यात तालुक्याला एक नंबर करण्यासाठी तुमची साथ हवी असे आवाहन बारामतीकरांना केले. त्यावर सुप्रिया सुळेंनी बारामती (Baramati) पहिल्यापासूनच एक नंबर आहे, असे म्हणत अजितदादांना प्रत्युत्तर दिले होते. सुळेंच्या या विधानाचा चाकणकरांनी समाचार घेतला. त्या म्हणाल्या, 90 टक्के घेऊन एक नंबरने पास होणाऱ्या विद्यार्थ्याला आपल्याला आणखी जास्त मार्क पडावेत असे नेहमीच वाटते. त्यामुळे दादांच्या कामाबाबत संपूर्ण महाराष्ट्र जाणतो. ती कांमामुळे आणि प्रशासनावर असलेल्या पकडीमुळेच बारामती क्रमांक एकवर असल्याचे चाकणकरांनी सांगितले.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीपूर्वी इंदापूर आणि पुरंदरमधील महायुतीतील नेते वेगळी भूमिका घेताना दिसत आहेत. यावर चाकणकर (Rupali Chakankar) म्हणाल्या, महायुतीत एकत्र काम करताना त्यांनी त्यांच्या वरिष्ठांशी चर्चा करूनच त्या पद्धतीचे वक्तव्य करावीत. त्यांचे वक्तव्य ही त्यांची वैयक्तिक मते असतील. महायुती म्हणून आम्ही एकत्रच काम करत आहोत, याचे भान त्यांनी ठेवणे आवश्यक आहे. तसेच नवीन राजकारणात आलेल्यांची काही विधान असतील तर ती बालिशपणाचे आहेत, असे म्हणत चाकणकरांनी अंकिता पाटील-ठाकरेंचाही समाचार घेतला.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT