Pune Politics : मोदींसाठी अडविला होता मेट्रो मार्ग; भाजपला आता काँग्रेसपुढे झुकावे लागले?

Mohan Joshi : काँग्रेसच्या टीकेनंतर 6 मार्चला ऑनलाईन पद्धतीने होणार रुबी हॉल ते रामवाडी मेट्रो मार्गीकेचे उदघाटन
Mohan Joshi
Mohan JoshiSarkarnama
Published on
Updated on

Pune Political News : पुणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होण्यासाठी रुबी हॉल ते रामवाडी मेट्रो मार्ग सुरू होणे गरजेचे होते. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सोयीची वेळ मिळत नसल्याने तिथपर्यंत मेट्रो सेवा सुरू करण्याचे भाजपने थांबवून धारले होते. या विरोधात काँग्रेस पक्ष आणि 'वेकअप' पुणेकर यांनी जनमताचा रेटा उभा केला. आता त्याला यश आले असून येत्या 6 मार्च रोजी मेट्रो मार्गाचे उदघाटन होत आहे, अशी माहिती माजी आमदार, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी (Mohan Joshi) यांनी दिली आहे. (Pune Politics)

जोशी म्हणाले, पुणेकरांना शहरात ठिकठिकाणी वाहतूककोंडीला तोंड द्यावे लागत आहे. यावर उपाययोजना म्हणून वनाज ते रामवाडी हा मेट्रो मार्ग चालू होणे खूप गरजेचे आहे. लांब अंतरापर्यंत मेट्रो धावली तर जास्तीत जास्त पुणेकर तिचा लाभ घेतील. कोथरूडहून स्टेशनपर्यंत जाणाऱ्यांची सोय होईल. त्यामुळे रस्त्यावरील वाहतुकीचा, रहदारीचा ताण कमी होण्यास मदत होणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Mohan Joshi
Raj Thackeray : उमेदवार ठरणार होता पण राज ठाकरेंनी थेट मुंबईच गाठली; पुण्यात नेमकं काय घडलं ?

याकडे मात्र, भाजप (BJP) दुर्लक्ष करत पंतप्रधानांच्या वेळेसाठी निम्म्याहून अधिक मेट्रो मार्ग अडविला गेला होता. या प्रकाराच्या विरोधात पुणेकरांचा आवाज उठविण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने विविध आंदोलने करण्यात आली. त्याला लोकांचा प्रतिसाद मिळाला होता. 'वेकअप' पुणेकर अभियानांतर्गत वाहतूक तज्ज्ञ आणि मेट्रो अधिकाऱ्यांच्या बैठका घेण्यात आल्या. त्यातून जनमताचा रेटा निर्माण केला. त्यापुढे सत्ताधारी भाजपला झुकावे लागले. ऑनलाईन पद्धतीने का होईना पंतप्रधान मोदी (Narendra Modi) 6 तारखेला मेट्रो मार्गाचे उदघाटन करणार आहेत, असे मोहन जोशी यांनी म्हटले आहे.

मेट्रो सेवा मुळात काँगेसचा (Congress) प्रकल्प आहे. हा प्रकल्प राबवताना 2014 पासून भारतीय जनता पक्षाने यात उदंड राजकारण केले. त्यांच्यातील अंतर्गत वादात प्रकल्प लांबत गेला आणि खर्च वाढला. आजही भाजपचे तेच राजकारण चालू आहे. पुण्याचे प्रश्न सोडविण्याविषयी त्यांच्यात अनास्थाच आहे. लोहगाव विमानतळ टर्मिनल 2 विमान वाहतुकीसाठी सज्ज झाले आहे. पण, तिथेही भाजपचे श्रेयाचे राजकारण चालू असून, उदघाटन अजूनही झालेले नाही, अशी टीका मोहन जोशी यांनी केली आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Mohan Joshi
Subhash Bhamre : सुभाष भामरेंची उमेदवारी अडचणीत; धुळे मतदारसंघाबाबत भाजपचा रिपोर्ट काय ?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com