Rupali chakankar- chandrkant Patil
Rupali chakankar- chandrkant Patil  Sarkarnama
पुणे

चंद्रकांत पाटील महाराष्ट्राच्या राजकारणाला पडलेलं गोड स्वप्न

अनुराधा धावडे

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis)  दबंग नेते आहेत, ते शंभर अजित पवारांना खिशात घालून फिरतात, फडणवीसांच्या वयावर तुम्ही जाऊ नका’,असं वक्तव्य भाजपा प्रदेशाध्यक्ष  चंद्रकांत पाटील (Chandrkanat Patil) यांनी पुण्यात बोलताना केलं होतं. चंद्रकांत पाटलांच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chaknkar) यांनी चंद्रकांत पाटलांवर उपहासात्मक टिका केली आहे.  

रुपाली चाकणकरांनी यावेळी ट्विट करत चंद्रकांत पाटील यांच्यावरही निशाना साधला आहे. ''चंद्रकांत दादा पाटील हे महाराष्ट्राच्या राजकारणाला पडलेलं एक गोड स्वप्न आहे कारण त्यांच्यामुळे महाराष्ट्रात सध्याला निखळ मनोरंजन होत आहे. महाराष्ट्राचे वित्तमंत्री म्हणून अजित दादांना माझी विनंती आहे की त्यांनी चंद्रकांतदादांवर करमणूक कर लावावा. केंद्रातील भाजप सरकार महाराष्ट्राचे हक्काचे GST चे पैसे देत नाही निदान यांच्यावरील करमणूक करामुळे सरकारचा काही भार तरी हलका होईल, '' असे ट्विट करत चंद्रकांत पाटलांची खिल्ली उडवली आहे.

तथापि, रुपाली चाकणकर आणि चंद्रकांत पाटील यांच्यात नेहमीच शाब्दिक चकमकी होत असतात. चंद्रकांत पाटलांनी आघाडीच्या नेत्यांवर टिकास्त्र डागल्यास चाकणकरही आपल्या शाब्दिक बाणांनी त्यांचे हल्ले परतावून लावताना दिसतात.

नक्की काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील?

'महाविकास आघाडी सरकार स्थापन होताना, राष्ट्रवादीकडे गृह खातं देऊ नका,असा सल्ला मी मी उद्धव ठाकरेंना सल्ला दिला होता. यावर

पाटलांच्या या विधानावर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीच्या वेळी तुम्ही फडणवीसांना कोणता सल्ला दिला होता, असा सवाल पत्रकारांनी पाटलांना विचारला. याला उत्तर देताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, ‘देवेंद्र फडणवीस दबंद नेते आहेत, ते शंभर अजित पवारांना खिशात घालून फिरतात, फडणवीसांच्या वयावर तुम्ही जाऊ नका.’, मात्र, त्यावेळी फडणवीसांनी अजित पवारांसोबत शपथ घेणं ही कॅल्क्युलेटेड रिस्क होती, असंही चंद्रकांत पाटील यांनी नमुद केलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT