lakhoba Lokhande म्हणजे नक्की कोण; चाकणकरांचा फडणवीसांना खोचक सवाल

या फेसबुक पेजवर अनेक महामानवांवर म्हणजे सावित्रीबाई फुलेंपासून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यापर्यंत, आणि त्यापुढे जाऊन राज्यातील राजकीय नेत्यावरंही अत्यंत अश्लील भाषेत टिका केली जाते.
Rupali chakankar- Devendra Fadanvis
Rupali chakankar- Devendra Fadanvis Sarkarnama

पुणे : फेसबुकवरील लखोबा लोखंडे पेजबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी मोठा खुलासा केला आहे. याचबरोबर त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या आयटी सेलवर हल्लाबोलही केला आहे. लखोबा लोखंडे या फेक फेसबुक पेजवरील अश्लील, समाजात, जाती-जातीत तेढ निर्माण करणाऱ्या लिखाणाला फडणवीसांचा पाठिंबा होता का,असा सवाल रुपाली चाकणकर यांनी उपस्थित करत फडणवीसांवर ताशेरे ओढले आहे.

Rupali chakankar- Devendra Fadanvis
अजित पवारांची मोठी घोषणा : ‘माळेगाव’चा पुढचा अध्यक्ष तावरे आडनाव सोडून असेल!

लखोबा लोखंडेबद्दल काय बोलल्या रुपाली चाकणकर?

फेसबुकवर लखोबा लोखंडे नावाचा एक पेज फेसबुक वर अॅक्टिव्ह आहे. या पेजवर अनेक महामानवांवर म्हणजे सावित्रीबाई फुलेंपासून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यापर्यंत, आणि त्यापुढे जाऊन राज्यातील राजकीय नेत्यावरंही अत्यंत अश्लील भाषेत टिका केली जाते. याबाबत चाकणकरांनी भाष्य केलं आहे. ''काल अभिजीत लिमये नावाच्या व्यक्तील पोलीसांनी अटक केली. अभिजीत लिमये नावाच्या व्यक्तीचं हे फेक फेसबुक पेज होतं. त्याला सायबर पोलीसांनी ताब्यात घेतलं. त्याला ताब्यात घेतल्यानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याला सोडवण्यासाठी फोन केला. म्हणजेच आतापर्यंत अभिजीत लिमये लखोबा लोखंडे नावाने ज्या अश्लील, समाजात, जाती-जातीत तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट करत होता त्याला फडणवीसांचा पाठिंबा होता का,असा सवाल रुपाली चाकणकर यांनी उपस्थित केला आहे.

तसेच, लिमयेने पोस्टच्या माध्यमातून जे लिखाण केले आहे, तेच फडणवीसांचे आहे का, हे पाहणही गरजेच आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर, भाजप चांगल काम करु किंबा आपल्याकडून चांगल काम होईल न होईल याची शाश्वती नसल्याने आयटी सेलला हाताशी धरून भाजप गलिच्छ राजकारण करत आहे. आता आपण सत्तेत येणार नाही, ही भाजपाची मानसिकचा झाली असल्याने भाजप आयटी सेल ला हाताशी धरुन गलिच्छ राजकारण करत आहेत. तुमच्यामुळे समाजात निर्माण होणाऱ्या तेढीला सर्वस्वी भाजप आणि भाजपचा आयटी सेल जाबाबदार आहे, असा हल्लाबोलही चाकणकरांनी केला आहे.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस दबंग नेते आहेत, ते शंभर अजित पवारांना खिशात घालून फिरतात, फडणवीसांच्या वयावर तुम्ही जाऊ नका’, असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात बोलताना केलं होतं. त्यानंतर चाकणकरांनी चंद्रकातदादांवर उपहासात्मक टिका करत त्यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. रुपाली चाकणकरांनी यावेळी ट्विट करत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावरही निशाना साधला आहे. ''चंद्रकांत दादा पाटील हे महाराष्ट्राच्या राजकारणाला पडलेलं एक गोड स्वप्न आहे कारण त्यांच्यामुळे महाराष्ट्रात सध्याला निखळ मनोरंजन होत आहे. महाराष्ट्राचे वित्तमंत्री म्हणून अजित दादांना माझी विनंती आहे की त्यांनी चंद्रकांतदादांवर करमणूक कर लावावा. केंद्रातील भाजप सरकार महाराष्ट्राचे हक्काचे GST चे पैसे देत नाही निदान यांच्यावरील करमणूक करामुळे सरकारचा काही भार तरी हलका होईल, '' असे ट्विट करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी चंद्रकांत पाटलांची खिल्ली उडवली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com