Rupali Patil Thombre Sarkarnama
पुणे

Kasba By Election : राष्ट्रवादीच्या रुपाली पाटील-ठोंबरेंनी ‘त्या’ फोटोबाबत दिले ‘हे’ स्पष्टीकरण

तो फोटो फेसबुकवर टाकेन, त्याचं स्टेट्‌स ठेवीन, हा माझा अधिकार आहे.

सरकारनामा ब्यूरो

पुणे : मी अजून मतदानच केलेले नाही, त्यामुळे मी कोणत्या कायद्याने गुन्हेगार होऊ शकत नाही. तो जो फोटो आहे, तो कसबा मतदारसंघातील एका मतदाराने मला पाठविला आहे. तो फोटो फेसबुकवर टाकेन, त्याचं स्टेट्‌स ठेवीन, हा माझा अधिकार आहे. मी कोणत्याही गोपनीयतेचा भंग केलेला नाही. माझ्यावर विश्वास नसेल तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना बोलवा आणि मी मतदान केले आहे की नाही, हे एकदा तपासा, असे स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) नेत्या रुपाली पाटील ठोंबरे (Rupali Patil Thombre) यांनी दिले आहे. (Rupali Patil Thombre's explanation for sharing the poll photo)

रुपाली पाटील ठोंबरे यांनी आपल्या फेसबुक पेजवर एक मतदान करतानाचा फोटो पोस्ट केला आहे. त्यावर ठोंबरे यांनी मतदान करतानाचा फोटो काढला असून गोपनीयतेच्या कायद्याचा भंग केला आहे, असा आरोप त्यांच्यावर होत होता. त्यामुळे त्यांनी पुढे येऊन त्या फोटोबाबत स्पष्टीकरण दिले आहे.

मतदान करतानाचा तो जो फोटो आहे, त्यातील हात माझा नाही. फोटो बाजूला राहू द्या. शाई बघा. भाजपच्या पाखालची जमीन सरकली आहे. त्यांनी पैशाच्या जोरावर मतदान विकत घेण्याचा प्रयत्न केला. त्यांनी गुंडांच्या माध्यमातून धमक्या दिल्या. पण, कसब्यातून रवींद्र धंगेकर हेच निवडून येणार आहेत, हे समजल्यामुळेच ते असे कुरघोड्याचे खेळ खेळत आहेत, असा आरोपही रुपाली पाटील ठोंबरे यांनी केला.

रुपाली पाटील ठोंबरे म्हणाल्या की, माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करणार असाल तर आम्ही ज्या खऱ्या तक्रारी पोलिसांत आणि निवडणूक आयोगाकडे केल्या आहेत. त्याबाबत गुन्हे दाखल झाले पाहिजेत. कसब्यातील मतदार सुज्ञ आहेत, ते रवींद्र धंगेकर यांनाच मतदान करतील.

माझ्यावर जर विश्वास नसेल तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना बोलवा. मी मतदान केले आहे की नाही, हे एकदा तपासा. त्यानंतर तुम्हाला माझ्यावर गुन्हा दाखल करायाचा असेल करा. मी जेलमध्ये जाताना भाजपच्या ज्या लोकांनी गुन्हे केले आहेत, त्या सर्वांना बरोबर घेऊन जाईन, असा अशा इशाराही त्यांनी दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT