Indapur News : राष्ट्रवादीला उच्चांकी मतदान देणाऱ्या गडाला भाजपकडून सुरूंग : हर्षवर्धन पाटील, राम शिंदेंचे इंदापुरात धक्कातंत्र

लोकसभा, विधानसभा,जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत बोरीमधून राष्ट्रवादीला उच्चांकी मतदान होते.
Harshvardhan Patil-Ram Shinde
Harshvardhan Patil-Ram ShindeSarkarnama

वालचंदनगर (जि. पुणे) : इंंदापूर (Indapur) तालुक्यातील बोरी गावातील पाच ग्रामपंचायत सदस्यांसह सुमारे २०० कार्यकर्त्यांनी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) व राम शिंदे (Ram Shinde) यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये (BJP) प्रवेश करुन राष्ट्रवादी कॉंग्रेसला (NCP) धक्का दिला. (Five Gram Panchayat members of NCP in Indapur along with 200 Activist's joined BJP)

बोरी गावावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे एकहाती वर्चस्व आहे. लोकसभा, विधानसभा,जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत बोरीमधून राष्ट्रवादीला उच्चांकी मतदान होते. दोन महिन्यांपूर्वी झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीमधील ज्येष्ठ व युवकामध्ये मतभेद झाल्यामुळे युवकांनी बंडखोरी करुन स्वतंत्र पॅनेल करुन निवडणूक लढवली.

Harshvardhan Patil-Ram Shinde
Rane Vs AjitDada : माझ्या फंद्यात पडू नका; नाही तर पुण्यात येऊन बारा वाजवीन : नारायण राणेंचे अजितदादांना प्रत्युत्तर

त्या निवडणुकीत युवकांच्या गटाचे ५ उमेदवार विजयी झाले होते. निवडणुकीपासूनच राष्ट्रवादीमध्ये धुसफूस सुरु होती. युवकांच्या गटाने सुमारे पाच ग्रामपंचायत सदस्यांसह सुमारे २०० कार्यकर्त्यानी भाजप प्रवेश करुन राष्ट्रवादी कॉंग्रेसला धक्का दिला. कार्यक्रमापूर्वी माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील व माजी मंत्री राम शिंदे यांची गावातून घोड्यावरून वाजत गाजत मिरवणूक काढून भाजपच्या शाखेचे उद्‌घाटन करण्यात आले.

Harshvardhan Patil-Ram Shinde
Rajan Patil On BJP Entry : 'बबनदादा माझे दाजी; त्यांचा निर्णय तो आमचा निर्णय' : राजन पाटलांनी भाजप प्रवेशाची बंदूक ठेवली शिंदेंच्या खांद्यावर

माजी मंत्री राम शिंदे म्हणाले की, आगामी निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसला झटका बसणार आहे. भाजप निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा पूर्ण कार्यक्रम करेल. राष्ट्रवादी साडेतीन जिल्ह्यांपुरता मर्यादित पक्ष आहे.

Harshvardhan Patil-Ram Shinde
Solapur News : मोहोळच्या राजकारणाला कलाटणी : उमेश पाटलांनी पोलिस आयुक्तालयात जाऊन घेतली रमेश कदमांची भेट

माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील म्हणाले की, माझ्या कार्यकाळामध्ये खडकवासल्याचे पाणी सणसर कटमधून येत होते. मात्र, सध्याच्या लाेकप्रतिनिधींमुळे आठ वर्षामध्ये एक थेंबही पाणी सणसर कटमधून आले नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना-भाजप सरकारने लाकडी-निंबोडी सिंचन योजनेच्या कामाला गती दिली आहे. योजनेचे टेंडर काढले असून, येत्या काही आठवड्यात निविदा निघून काम वेगाने सुरु होईल. विकास कामासाठी दूरदृष्टी असलेले नेतृत्व लागते. नुसते हावभाव करून गोड बोलून विकास होत नसतो, अशी टीकाही त्यांनी आमदार दत्तात्रेय भरणे यांचे नाव न घेता केली.

Harshvardhan Patil-Ram Shinde
Gulabrao Patil : होय मी गद्दारी केली; पण... : गुलाबराव पाटलांची जाहीर सभेत कबुली

या वेळी भाजपचे पुणे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, भाजप किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष वासुदेव काळे, राज्य साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक, पुणे जिल्हा भाजपचे सरचिटणीस अविनाश मोटे, इंदापूर तालुकाध्यक्ष ॲड. शरद जामदार, कर्मयोगीचे संचालक वसंत मोहोळकर, माेहन दुधाळ, अभिजित देवकाते, गजानन वाकसे उपस्थित होते.

भाजपत प्रवेश केलेले ग्रामपंचायत सदस्य व प्रमुख कार्यकर्ते

ग्रामपंचायत सदस्य स्वाती मधुकर वाघमोडे, गौरी संतोष धालपे, प्रियांका निखील ठोंबरे, कांचन दिलीप धायगुडे, सचिन धालपे या ग्रामपंचायत सदस्यांसह माजी ग्रामपंचायत सदस्य मधुकर वाघमोडे, रमेश पवार,वैभव सुधाकर देवडे, सचिन वाघमोडे, दयानंद चव्हाण, विजय देवडे, आकाश गवळी, हनुमंत लांबाते, शिवदास जगताप, गणेश पवार, सागर देवडे,बापू लाळगे विशाल जाधव (लासुर्णे) यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com