Rupali Patil Thombre 
पुणे

Rupali Thombare: चाकणकरांच्या राजीनाम्यानंतर रुपाली ठोंबरे रडल्या! अजितदादांची आठवण काढत चाकणकरांवर केले गंभीर आरोप

Rupali Thombare: अशोक खरात प्रकरणात नाव आल्यानं राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाच्या राजीनाम्यानंतर रुपाली चाकणकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदाचाही राजीनामा दिला आहे.

सरकारनामा ब्युरो

Rupali Thombare: स्वयंघोषित ज्योतिषी आणि आध्यात्मिक गुरु अशोक खरात प्रकरणात नाव आल्यानं राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाच्या राजीनाम्यानंतर रुपाली चाकणकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदाचाही राजीनामा दिला आहे. यानंतर चाकणकरांवर सातत्यानं आरोप करणाऱ्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी अजित पवारांचं नाव घेताच त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. पण त्याचवेळी त्यांनी रुपाली चाकणकर यांच्यावर पुन्हा एकदा गंभीर आरोपही केले.

साम टीव्हीच्या प्रतिनिधीशी बोलताना रुपाली पाटील ठोंबरे म्हणाल्या, "मी ज्यावेळी पक्षात आले त्यावेळी माझा रुपाली चाकणकरांशी कुठलाही वादच नव्हता. कारण कुठल्याही पक्षात संविधानिक पद हे एक व्यक्ती एक पद असं असावं, असं आमचं म्हणणं आहे. पण चाकणकरांनी ज्या पद्धतीनं कारभार केला तो अत्यंत चुकीचा केला. अजितदादांचे काय विचार होते? काय ध्येय धोरणं होती? हे मी बाहेरुन येऊन मला समजलं. पण चाकणकर या पक्षात राहून त्यांना कळलं नाही.

अजितदादांनी पक्ष वाढण्यासाठी, संघटन वाढण्यासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना बळ दिलं, आणि चाकणकरांनी पदोपदी नाहक अजितदादांच्या माणसांना त्रास देण्याचं काम केलं. त्यांची बदनामी केली त्या कार्यकर्त्यांची पद काढून घेतली. रुपाली पाटील ठोंबरे तुमच्यासमोर बोलतेय म्हणून तुम्हाला हे वाटतंय पण प्रत्येक कार्यर्त्या भगिनीची ही खदखद आहे. त्यांच्याकडं नाहीए, बोलायला. पण आता त्यांना न्याय मिळाला.

दरम्यान, ज्यावेळी अजितदादांनी पक्षासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांना बळ देत असल्याचं रुपाली पाटील ठांबरे यांनी सांगितलं तेव्हा अजितदादांचं नाव घेताच त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. अजितदादा पक्ष वाढीसाठी किती मेहनत घेत होते, हे सांगत असताना त्यांना गहिवरुन आलं. पण आता चाकणकरांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादीतील सर्वसामान्य कार्यकर्त्यांना बळ मिळालं असल्याचं रुपाली पाटील ठोंबरेंनी म्हटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT