Eknath Shinde, Rupali Thombre, Rahul Shewale
Eknath Shinde, Rupali Thombre, Rahul Shewale Sarkarnama
पुणे

आदित्य ठाकरेंना अडचणीत आणणाऱ्या खासदार शेवाळेंच्या विरोधात रुपाली ठोंबरेंनी पेटवली वात

सरकारनामा ब्यूरो

Rahul Shewale News : बाळासाहेबांची शिवसेना (Shivsena) पक्षाचे नेते खासदार राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांनी लोकसभेमध्ये शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यावर आरोप केले होते. मात्र, आता त्यांच्याच अडचणी वाढल्या आहेत. शेवाळे यांच्या आरोपांचे पडसाद विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी एसआयटीची चौकशीची घोषणा केली. त्यामुळे शेवाळे यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत, शेवाळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. शेवाळे यांनी एका महिलेवर बलात्कार केल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यावर कोणतीही कारवाई होत नसल्याचा मुद्दा शिवसेना ठाकरे गटाच्या आमदार मनिषा कायंदे (Manisha Kayande) यांनी विधान परिषदेत उपस्थित केला होता. त्यानंतर गोऱ्हे यांनी चौकशीचे आदेश दिले.

यानंतर रुपाली पाटील ठोंबरे यांनी शेवाळे यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेलाच समोर आणले होत. त्यांनी फेसबूक लाईव करत पिडीत महिलीचे बाजू मांडली होती. खासदार शेवाळे यांनी संबंधीत महिलेवर दाऊदशी संबंध असल्याचे आरोप केले होते. त्या आरोपांना ठोंबरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून उत्तर दिले होते.

त्यानंतर रुपाली पाटील ठोंबरे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची नागपूरमध्ये भेट घेतली. त्यांनाही पिडीत महिलेने केलेल्या आरोपांची फाईल दिली. तसेच आज (ता.२८) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची भेट घेऊन त्यांच्याकडे पुराव्यासह २५० पानांची फाईल दिली. त्यामध्ये संबंधित महिलेने पोलिसांना दिलेलेले जबाब, राहुल शेवाळेंचे फोटो, महिला आणि शेवाळे यांचे मोबाईल चॅटचा समावेश असल्याचे ठोंबरे यांनी सांगितले. त्यावर शिंदे यांनी या प्रकरणाची संपूर्ण माहिती घेऊन कारवाई करण्याचे आश्वास दिले.

दरम्यान, अधिवेशनामध्ये आमदार कायंदे यांनी शेवाळे यांच्या विरोधात आरोप केले होते. त्या म्हणाल्या होत्या, राहुल शेवाळे यांच्याविरोधात पोलीस आयुक्त यांच्याकडे देखील तक्रार केली आहे. मात्र, पोलिसांचा पीडितेवर दबाव आहे. पीडित तरुणीला मुंबईत यायचे आहे. मात्र, दबावामुळे ती मुंबईत येऊ शकत नाही. या प्रकरणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे तक्रार केली आहे. या पीडित तरुणीच्या जीविताला धोका असल्याचे आमदार कायंदे यांनी म्हटले होते. कायंदे यांच्या मागणीनंतर एसआयटी स्थापन करण्याची घोषणा उपसभापतींनी केली होती.

त्यामुळे दिशा सॅलियन मृत्यू प्रकरणात आदित्य ठाकरेंचे नाव घेणारे खासदार शेवाळे स्वत: अडचणीत आल्याची चर्चा आहे. दिशाच्या मोबाईलवर AU नावाने अनेक फोन आले होते, आसा आरोप शेवाळे यांनी केला होता. तसेच AU म्हणजे आदित्य उद्धव असे बिहार पोलिसांच्या तपासात समोर आल्याचा दावाही त्यांनी केला होता. त्यावरुन महाराष्ट्रात हिवाळी अधिवेशन सुरु असतानाच राजकारण तापले होते. मात्र, आदित्य यांना अडचणीत आण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेवाळेंच्या त्यांच्याच जुन्या प्रकरणामुळे अडचणी वाढण्याची शक्याता निर्माण झाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT