Anil Deshmukh News : अनिल देशमुखांची अखेर तुरुंगातून सुटका; राष्ट्रवादीचा जल्लोष

Anil Deshmukh News : अनिल देशमुख यांची नुकतीच जेलमधुन सुटका झाली आहे.
Anil Deshmukh News
Anil Deshmukh NewsSarkarnama
Published on
Updated on

Anil Deshmukh News : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तब्बल १३ महिन्यानंतर अनिल देशमुख हे तुरुंगातून बाहेर आले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून आनंद व्यक्त करण्यात येत आहे.

अनिल देशमुख हे तब्बल १३ महिन्यानंतर जेलबाहेर आले. त्यामुळे त्यांच्या स्वागतासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, दिलीप वळसे पाटील आणि खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होत्या.

Anil Deshmukh News
Anil Deshmukh News: 'ईडी सरकारचे 'वर्ल्ड रिकॉर्ड'; देशमुखांवर तब्बल १०९ वेळा रेड'

दरम्यान, अनिल देशमुख यांच्या सुटकेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या, ''देशमुख कुटुंबावर तब्बल १०९ वेळा रेड टाकून ईडी सरकारने वर्ल्ड रेकॉर्ड केलं आहे'', असा हल्लाबोल त्यांनी केंद्र सरकारवर केला.

सुप्रिया सुळे माध्यमांशी संवाद साधताना म्हणाल्या ''अनिल देशमुख यांच्यावर या ईडी सरकारकडून खोटे आरोप करण्यात आले. कोर्टाच्या आर्डरमध्ये कुठलाही पुरावा त्यांच्याविरोधात सापडलेला नाही. केंद्र सरकार आणि राज्य सरकारने तर वर्ड रेकॉर्ड केलंय. अनिल देशमुख आणि त्यांच्या कुंटुबांवर तब्बल १०९ वेळा रेड टाकण्यात आली. एवढ्या वेळा रेड करावी लागली याचा अर्थ त्यांना काहीही सापडले नाही. याबाबतची नोंद देखील कोर्टाच्या आर्डरमध्ये आहे'', असं त्या म्हणाल्या.

Anil Deshmukh News
Ajit Pawar : हिवाळी अधिवेशन अर्धवट सोडत अजित पवार तातडीनं मुंबईत; काय आहे कारण?

अनिल देशमुख यांच्या स्वागताची राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार तयारी केली. आर्थर रोड जेलबाहेर मोठ्या संख्येने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांच्या सुटकेमुळे कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात आनंदोत्सव साजरा केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com