Pune News : पुण्यातील फुरसुंगी परिसरातील द्वारकाधीश गोशाळेत गोरक्षकांनी शेतकऱ्यांच्या म्हशी घेऊन गेल्याच्या प्रकरणावरून तणाव निर्माण झाला आहे. या घटनेची पाहणी करण्यासाठी गेलेले रयत क्रांती संघटनेचे नेते आणि विधानपरिषदेचे आमदार सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांच्यावर गोरक्षकांनी हल्ल्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी खोत आणि शेतकरी आता न्याय मागण्यासाठी सिंहगड रोड पोलीस स्थानकासमोर आंदोलन करणार आहेत.
काय आहे प्रकरण?
काही दिवसांपूर्वी गोरक्षकांनी जनावरांची वाहतूक करणाऱ्या एका गाडीला अडवलं होतं त्यानंतर ड्रायव्हरला देखील मोठ्या प्रमाणात मारहाण करण्यात आली होती. यानंतर पोलिसांनी संबंधित जनावर ताब्यात घेऊन त्या जनावरांना गोशाळेमध्ये ठेवलं होतं.
त्यानंतर याबाबत कोर्टाने शेतकऱ्यांना जनावरे परत करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र जी जनावरे गोरक्षकांनी नेली होती. ती जनावरं गो शाळेमध्ये नसल्याचा आरोप आता शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे खरंच शेतकऱ्यांची जनावरे गोशाळेमध्ये आहेत का? नाही हे पाहण्यासाठी सदाभाऊ खोत हे गोशाळेमध्ये गेले होते त्या ठिकाणी हा सर्व प्रकार घडला आहे.
फुरसुंगी परिसरातील द्वारकाधीश गोशाळेत आमदार सदाभाऊ खोत हे शेतकऱ्यांसह गोशाळेत परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी गेले होते. यावेळी गोरक्षकांनी खोत आणि शेतकऱ्यांवर धावून जाऊन हल्ल्याचा प्रयत्न केल्याचा दावा करण्यात येत आहे. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सदाभाऊ खोत यांचे आंदोलन या घटनेनंतर सदाभाऊ खोत यांनी गोरक्षकांच्या या कृत्याचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे. गोरक्षकांच्या मनमानी कारवायांमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याचा आरोप त्यांनी यापूर्वीही केला आहे. आता या प्रकरणी दाद मागण्यासाठी खोत आणि शेतकरी सिंहगड रोड पोलीस स्थानकासमोर आंदोलन करणार आहेत.
दरम्यान, गोरक्षकांवर बोलताना सदाभाऊ खोत यांनी सांगितले की, गोरक्षणाच्या नावाखाली राज्यात मोठी लॉबी सुरू आहे. यांचे पुणे, कोल्हापूर,सांगली,मुंबई सारख्या ठिकाणी कॉर्पोरेट ऑफिस आहेत. या माध्यमातून वेगळेच गैरप्रकार सुरू आहेत त्याचा त्रास मात्र शेतकऱ्यांना होत आहे. सरकारने याबाबत कारवाई केली नाही तर पोलीस स्टेशन समोर आम्ही जनावराच्या छावण्या उभं करू असा इशारा देखील खोत यांनी दिला.
गाई ,म्हशी यांचं शेण, दूध आमची माय, बहिण, बाप काढतो आणि हे गोरक्षक म्हणणारे मोठ्या मोठ्या कॉर्पोरेट ऑफिस मधून धंदा करत आहेत. मुख्यमंत्र्यांशी याबाबत मी बोलणार आहे. शेतकऱ्यांचा व्यवसाय अशाने मरून जाईल, गाड्या अडवल्या जातात, त्यांना मारलं जातं, त्यामुळे यावर कारवाई करा.
एक गुन्ह्यातील जनावरे द्वारकाधीश गोशाळा भेकराईनगर येथे जमा होती. ती जनावरे अर्जदार यांना परत करावी म्हणून न्यायालयाचे आदेश असल्याने सिंहगड रोड पो स्टे सपोनि चव्हाण, पोउपनि मालुसरे व स्टाफ यांच्यासह आमदार सदाभाऊ खोत व काही शेतकरी असे गोशाळेत जनावरे आहेत कि नाही हे पाहण्यासाठी आले होते.
जनावरे तेथे नसल्याने आमदार सदाभाऊ खोत मीडियाला बाईट देत असताना गोरक्षक ऋषिकेश कामटे व इतर 2 ते 3 गोरक्षक तेथे येऊन सदाभाऊ खोत यांनी त्यांचे म्हणणे ऐकून घ्यावे यासाठी आग्रह धरत होते परंतु सदाभाऊ खोत तेथून निघून जात असताना नमुद गोरक्षक यांनी जास्त आग्रह धरला सबब कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिस निरीक्षक खांडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक जाधव व स्टाफ यांनी तेथे परिस्थिती हाताळली असून या ठिकाणी धक्काबुक्कीचा कोणताही प्रकार घडला नाही.
तसेच आमदार सदाभाऊ खोत व त्यांच्या सोबत आलेले शेतकरी तसेच गोरक्षक सदर ठिकाणावरून निघून गेलेले आहेत घटनास्थळी शांतता आहे. अशी माहिती पोलिसांकडून
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.