Manoj Jarange Chitra Wagh Clash: मनोज जरांगेंनी चित्रा वाघांना झाप झाप झापलं; म्हणाले,'माझ्या नादी लागलीस,तर तुझं सगळं गबाळ...'

Maratha Reservation : मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आईला शिवी दिली, असा आरोप आमदार चित्रा वाघ यांनी केला होता. जरांगेंच्या दोन वक्तव्यांचा संदर्भ देणारा व्हिडिओ पोस्ट सोशल मीडियावर वाघांनी शेअर केला होता.
Manoj Jarange Patil On Chitra Wagh  (1).jpg
Manoj Jarange Patil On Chitra Wagh (1).jpgSarkarnama
Published on
Updated on

Beed News : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी येत्या 29 ऑगस्टला कोणत्याही परिस्थितीत मुंबईत आंदोलन करणारच असा निर्धार बोलून दाखवत थेट सरकारलाच घाम फोडला आहे. तसेच यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आज आणि उद्या अशा दोन दिवसांचा अल्टिमेटमही दिला. जर आरक्षण दिलं नाही, तर महायुती सरकार उलथून टाकण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. यावेळी जरांगेंनी भाजपच्या विधान परिषदेच्या आमदार चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनाही झाप झाप झापलं आहे.

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आईला शिवी दिली, असा आरोप आमदार चित्रा वाघ यांनी केला होता. जरांगेंच्या दोन वक्तव्यांचा संदर्भ देणारा व्हिडिओ पोस्ट सोशल मीडियावर वाघांनी शेअर केला होता. याच मुद्द्यावरुन भाजपनं जरांगे पाटलांवर टीकेची झोडही उठवण्यास सुरुवात केली होती. आता याविषयी जरांगेंनी प्रत्युत्तर देताना चित्रा वाघ यांच्यावर शा‍ब्दिक हल्ला चढवला आहे.

जरांगे म्हणाले, तू माझ्या नादी लागू नकोस. माझ्या नादी लागलीस तर तुझं सगळं गबाळ उचकीन. संध्याकाळपर्यंत तुझी सगळी माहिती माझ्याकडे येईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. ती जी बाई बोलली, कोण वाघीण तिला आमची आई रक्ताच्या थारोळ्यात पडली होती, तेव्हा दिसलं नाही का? असा संतप्त सवालही मनोज जरांगेंनी (Manoj Jarange Patil) यावेळी केला.

तेव्हा तू कुठे मे###, आमच्या तीन-चार वर्षांच्या पोरी रक्ताच्या थारोळ्यात पडल्या, तेव्हा तू झोपली होतीस का? तेव्हा तुला कोणी दिसलं नाही का, तेव्हा तू कुठे गेली होती?आता तुझी जात जागी झाली. कवर तू खेटरं चाटतेस, माझ्या नादी तू लागू नकोस अशी टीका जरांगेंनी केली आहे.

Manoj Jarange Patil On Chitra Wagh  (1).jpg
Ajit Pawar: अजितदादांचा कोल्हापूरमध्ये मोठा धमाका; काँग्रेससोबत 40 वर्षे एकनिष्ठ राहिलेल्या कुटुंबातील बड्या नेत्यालाच फोडलं

मनोज जरांगेंनी भाजप आमदारांना फटकारतानाच तू बाई असशील तर आमच्याकडेही बाया आहेत. आमच्या आईवर 307 ची केस लागली, तुझ्यावर तशी केस केली तर चालेल का?, असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी विचारला. आता जरांगेंनी केलेल्या शा‍ब्दिक हल्ल्यानंतर चित्रा वाघ काय प्रत्युत्तर देतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

मनोज जरांगेंनी भाजप आमदारांना फटकारतानाच तू बाई असशील तर आमच्याकडेही बाया आहेत. आमच्या आईवर 307 ची केस लागली, तुझ्यावर तशी केस केली तर चालेल का?, असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी विचारला. आता जरांगेंनी केलेल्या शा‍ब्दिक हल्ल्यानंतर चित्रा वाघ काय प्रत्युत्तर देतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Manoj Jarange Patil On Chitra Wagh  (1).jpg
BJP Vs Shivsena : भाजपचे दोन शिलेदार एकनाथ शिंदेंना सुट्टीच देईनात... नाईकांपाठोपाठ आमदार केळकरांनीही अंगावर घेतलं!

मनोज जरांगे पाटलांनी रविवारी झालेल्या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. जरांगे म्हणाले, मुख्यमंत्री फडणवीस यांचं मराठ्यांना बरबाद करण्याचं स्वप्न आहे. मराठ्यांची पोरं आत्महत्या करून मेली पाहिजेत, हे त्यांचं काम आहे, असा गंभीर आरोपही त्यांनी केला. तसेच देवेंद्र फडणवीस यांना मराठ्यांविषयी खुन्नस आहे, अशी घणाघाती टीकाकरताना फडणवीसांच्या आईविषयी आक्षेपार्ह विधान केल्यामुळे राजकीय वाताववरण तापलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com