Deepak Kesarkar  Sarkarnama
पुणे

Sadabhau Khot : 'तुमचं शिक्षण अपुरं असेल तर आमच्या बापाच्या...' : सदाभाऊंनी मंत्री केसरकरांचं शिक्षणच काढलं

Deepak Kesarkar : दीपक केसरकर यांच्यावर सदाभाऊ खोत यांची घणाघाती टीका...

Sudesh Mitkar

राज्यातील शाळांमध्ये पहिलीपासून शेतीविषयक अभ्यासक्रम सुरू करणार असल्याची घोषणा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी नुकतीच केले होती. यावर आता शेतकरीनेते सदाभाऊ खोत यांनी याचा चांगला समाचार घेतला आहे.

शेतीचे शास्त्रशुद्ध ज्ञान घेऊन व्यावहारिक शेती केली तर शेतीमधून चांगल्या प्रकारचे अर्थार्जन होऊ शकते. खरं तर विद्यार्थी जसे घडवू तसे घडतात. विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणापासून शेतीविषयक माहिती मिळण्यासाठी पहिलीपासून कृषीचा शालेय शिक्षणात समावेश करण्यात येणार असल्याची घोषणा राज्याची शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दापोलीत केली होती. यावर राज्यभरात चर्चा रंगलेली दिसली काही सकारात्मक, तर काही नकारात्मक प्रतिक्रियादेखील याबाबत आल्या आहेत. यावर सदाभाऊ खोत यांनी पुण्यातील साखर संकुल येथे प्रतिक्रिया दिली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

यावर सदाभाऊ खोत म्हणाले, 'केसरकर यांनी घेतलेल्या निर्णयाबद्दल त्यांचा अभिनंदन परंतु त्यांना हे माहिती नाही, की शेतकऱ्याचा बाप हाच एक विद्यापीठ असतो. त्या विद्यापीठांमध्ये भलेभले शिकून जातात. मात्र जर तुमचं शिक्षण अपुरं असेल तर आमच्या बापाच्या विद्यापीठामध्ये शिकायला या,' असा खोचक टोला सदाभाऊ खोत यांनी केसरकर यांना लगावला.

'शाळेमध्ये धडे देण्यापेक्षा शेतमालाला कसा भाव देता येईल, याबाबतचे धडे द्या. शेती कशी करावी, बांधावर कसं उभं राहावं, कधी पेरावं, हे आमच्या बापाला चांगलं कळतं ते आमचा बाबा शाळेतलं पुस्तक वाचून शिकलेला नाही. शेतकऱ्याचे घर हेच त्याचे विद्यापीठ आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या पोरांना शाळेतील कोणत्याही धड्याची गरज नसल्याचं सदाभाऊ खोत यांनी सांगितलं.

Edited By: Rashmi Mane

R...

SCROLL FOR NEXT