Sadabhau Khot Protest
Sadabhau Khot Protest  Sarkarnam
पुणे

Sadabhau Khot Protest: सदाभाऊंनी बंद गेटवरून उडी मारली, पण आयुक्तांच्या कार्यालयात पोहचलेच नाहीत..

सरकारनामा ब्युरो

Sadabhau Khot Onion Protest at PMC : राज्यात आधीच कांद्याचे भाव गडगडले आहेत.कांद्याला भाव मिळण्यासाठी राज्यभरातून शेतकऱ्यांची मागणी होत असताना, पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने रस्त्यावर कांदा विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांचा टेम्पो जप्त करून त्याला तब्बल ४० हजार रूपयांचा दंड लावला. या घटनेनंतर रयत क्रांतीचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी आक्रमक पवित्रा घेतला. (Sadabhau reached the commissioner's office by jumping from the closed gate)

शेतकऱ्यांचा शेतमाल शहरात विक्री करण्याच्या निषेध करणाऱ्या महापालिकेच्या (PMC) विरोधात रयत क्रांती संघटनेने हे आंदोलन केले. सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांच्या नेतृत्वाखाली महापालिका प्रशासनाच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या.आंदोलनात शेतकऱ्यांनी कांदे आणले होते.सुरक्षा रक्षकांनी आंदोलकांना गेटवरच रोखले. पण संधी साधत सदाभाऊ खोत आणि त्यांचे काही सहकारी थेट गेटवरच चढले आणि महापालिकेच्या आवारात प्रवेश केला. मात्र महापालिकेच्या मुख्य इमारतीचा दरवाजाच बंद असल्याने त्यांना आयुक्तांच्या कार्यालयात पोहचताच आले नाही. पण महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी संबंधित शेतकऱ्याचा दंड माफ करत त्याची गाडी त्याला पुन्हा परत केली.

या घटनेच्या निषेधार्थ सदाभाऊ खोत यांनी महापालिकेच्या पालिकेच्या गेटवर चढत आंदोलन केले. सदाभाऊ खोत यांनी महापालिकेच्या आवारात आंदोलकांनी महापालिकेच्या आवारात कांदे फेकून निशेष व्यक्त केला.

मांजरी येथे कांदा विक्री करणाऱ्या शेतकऱ्यावर महापालिकेच्या अधिकाऱ्याने दंडात्मक कारवाई केल्याच्या घटना नुकतीच घडली आहे.बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांवर महापालिकेच्या अधिकाऱ्याने दंडात्मक कारवाई केल्याच्या निषेधार्थ रयत क्रांती मोर्चा संघटनेच्यावतीने सोमवारी महापालिकेसमोर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांवर होणाऱ्या कारवाईचा शेतकऱ्यांनी अतिशय तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला.

या घटनेच्या निषेधार्थ रयत क्रांती मोर्चा संघटनेच्यावतीने सोमवारी महापालिकेसमोर तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले. शेतकऱ्यांवर होणाऱ्या कारवाईचा शेतकऱ्यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. तावडी (ता. बार्शी) या गावातील शेतकरी 8 एप्रिल रोजी मांजरी भागातील ग्रामसेवक प्रशिक्षण जवळ परिसरात कांदा विक्री करीत होते.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT