Atique Ahmed's Last Letter: अतिकने लिहिलेले शेवटचे पत्र सर्वोच्च न्यायालयाकडे पाठविले; पत्रात काही बड्या नेत्यांची नावे?

Atique Ahmed Case: अतिक-अश्रफ खून प्रकरणानंतर मुख्यमंत्री आदित्यनाथ यांची सुरक्षा वाढविण्यात आली आहे. त्यांची सुरक्षा Z+ वरून दुप्पट Z+ करण्याची तयारी सुरू आहे.
Atique Ahmed
Atique Ahmed Sarkarnama
Published on
Updated on

लखनऊ : मृत्यूच्या भयाने पछाडलेला गॅंगस्टार अतिक अहमद याने त्याचा खून होण्यापूर्वी एक पत्र (Letter) लिहिले होती. त्यात त्याने मी मेलो, तर हे पत्र सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) पाठविण्यात यावे, असे म्हटले होते. त्यात पत्रात ‘ज्यांच्यापासून आपल्या जिवाला धोका आहे, अशांची नावे’ असू शकतात. तसेच, काही नेते (Leader) आणि अधिकाऱ्यांची (Officer) नावे असण्याची शक्यता आहे. अतिकचे ते पत्र सर्वोच्च न्यायालयाकडे सोपविण्यात आले आहे. (Last letter written by Atique Ahmed was sent to the Supreme Court)

दरम्यान, मृत्यूपूर्वी सुनावणीसाठी जात असताना अतिकचा भाऊ अश्रफ यानेही या पत्राचा उल्लेख केला होता आणि ज्या अधिकाऱ्याने आपल्याला धमकी दिली होती, त्याचे नाव या पत्रात लिहिल्याचे सांगितले जात आहे. याबाबतचे वृत्त एका वृत्तवाहिनीने दिले आहे.

Atique Ahmed
Atique Ahmed Murder Case : अतिक आणि अशरफवर गोळ्या झाडण्यासाठी पिस्तूल देणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू

अतिक अहमद याने ते पत्र सर्वोच्च न्यायालयाच्या नावाने लिहिल्याचे सांगण्यात येते. सुनावणीसाठी २९ मार्च रोजी जात असताना त्या पत्राचा उल्लेख अश्रफ याने केला होता. ज्यांच्यापासून आपल्या जिवाला धोका आहे, अशा लोकांची नावे या पत्रात असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

पत्रात अनेक मोठी नावे

अतिक अहमद याच्या शेवटच्या पत्रात पाच नेत्यांची नावेही असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याशिवाय काही व्यापारी असण्याची शक्यता आहे. प्रयागराजमध्ये वैद्यकीय तपासणीसाठी नेत असताना शनिवारी रात्री गॅंगस्टार अतिक अहमदला पोलिस कोठडीत आठ गोळ्या झाडण्यात आल्या. या गोळ्या अतिकच्या डोक्यावर, मानेवर आणि छातीवर लागल्याचे शवविच्छदेन अहवालात पुढे आले आहे.

Atique Ahmed
Sambhajiraje's offer to Abhijeet Patil : संभाजीराजेंची अभिजीत पाटलांना ऑफर : ‘तुम्हाला आमदार करण्याची जबाबदारी आमची...’

तपासासाठी दोन एसआयटी

अतिक आणि अशरफ अहमद खून प्रकरणाचा तपास करण्यासाठी दोन एसआयटी स्थापन करण्यात आल्या आहेत. पोलिस महासंचालक आर. के. विश्वकर्मा यांनी प्रयागराजचे अतिरिक्त पोलिस महासंचालक, प्रयागराज पोलिस आयुक्त आणि एफएसएल संचालक यांच्या नेतृत्वाखाली एसआयटी स्थापन केली आहे. दुसरीकडे, प्रयागराज पोलिसांनही शहागंज पोलिस ठाण्यात नोंदवलेल्या हत्येप्रकरणी दुसरी एसआयटी स्थापन केली आहे. अतीक ब्रदर्स खूनप्रकरणी उत्तर प्रदेश सरकार कसून तपास करत आहे.

Atique Ahmed
Karnataka Election: महाराष्ट्र एकीकरण समिती १० वर्षांनंतर प्रथमच बेळगावातील ६ मतदारसंघात निवडणूक लढणार: पाच ठिकाणी उमेदवार जाहीर

योगींची सुरक्षा वाढविली

अतिक-अश्रफ खून प्रकरणानंतर मुख्यमंत्री आदित्यनाथ यांच्या घरी बैठकांचा सिलसिला सुरू आहे. योगी आदित्यनाथ यांनी पोलिस महासंचालक, मुख्य गृह सचिव यांच्यासोबत राज्याच्या सुरक्षा व्यवस्थेबाबत बैठक घेतली. याशिवाय मुख्यमंत्र्यांचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री योगींची सुरक्षाही वाढविण्यात आली आहे. त्यांची सुरक्षा Z+ वरून दुप्पट Z+ करण्याची तयारी सुरू आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com