Pune News : काँग्रेस नेते माजी खासदार मिलिंद देवरा हे आज शिवसेना शिंदे गटांमध्ये प्रवेश करणार आहेत. यांच्या शिवसेना प्रवेशामुळे काँग्रेससह महाविकास आघाडीतील नेत्यांना धक्का बसला आहे. काँग्रेसमध्ये यावरुन निराशचे वातावरण आहे, तर महाविकास आघाडीतील विविध नेत्यांची वक्तव्ये आता समोर येत आहेत. (Latest Marathi News)
राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गटाच्या) खासदार सुप्रिया सुळे यांनी आज पुण्यातील बावधन परिसरातील पाणी आणि वीज प्रश्नाबाबत पाहणी केली. यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी सुळे म्हणाल्या, 'बावधन परिसरातील नागरिकांना पाणी, कचरा आणि वीज प्रश्न भेडसावत आहे. बेसिक सोयीसुविधा अभावी या परिसरातील नागरिक भरडला जात आहे आणि त्यांच्याकडे आपले प्रश्न मांडण्यासाठी स्थानिक प्रतिनिधी देखील उपलब्ध नाहीत. नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य नसल्यामुळे नागरिकांना आपले प्रश्न कुणाकडे घेऊन जायचे? हे समजणे असे झाले आहे. त्यामुळे राज्य सरकारने तातडीने स्थानिक पातळीवरच्या निवडणुका घेणे आवश्यक आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
मिलिंद देवरा यांचा शिंदे गटातील प्रवेशाबाबत सुप्रिया सुळे म्हणाल्या, "देवरा यांचा तो वैयक्तिक निर्णय आहे. राजकारणामध्ये अनेकदा तिकीटं कापली जातात. मात्र, त्यामुळे आपली विचारधारा सोडायची का नाही? हा निर्णय वैयक्तिक पातळीवर घ्यायचा असतो. मिलिंद देवरा हे शिंदे गटात जात आहेत. कारण महाविकास आघाडी मध्ये ही जागा शिवसेनेच्या वाट्याला आहे. तसेच महायुतीकडे या जागेवरती लढण्यासाठी सक्षम उमेदवार नसल्यामुळे देवरांना इम्पोर्ट केलं असल्याची टीका सुप्रिया सुळे यांनी केली.
सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या देवरा यांच्या जाण्यामुळे महाविकास आघाडीला कोणताही फरक पडणार नाही. कारण मुंबईतील सर्वे मध्ये महाविकास आघाडी अत्यंत सक्षमपणे निवडणूक जिंकण्यास समर्थ आहे. मिलिंद देवरा यांना महायुतीने तिकीट ऑफर केले असेल जे त्यांना महाविकास आघाडीमध्ये मिळाले नसते. मिलिंद देवरा यांच्या वडिलांना अनेक वर्ष काँग्रेसने मंत्रीपद दिले तसेच ते मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष देखील होते. देवरा हे स्वतः काँग्रेस कडून मंत्री होते त्यामुळे त्यांनी हा निर्णय का घेतला आहे? हा काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न असल्याचं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
यावेळी सुप्रिया सुळे यांना मिलिंद देवरा हे लोकसभेला विजय होतील का? असा प्रश्न विचारला असता सुळे म्हणाल्या त्यांच्या विजयाबाबत मुंबईची जनता ठरवेल. मी तिथली मतदार नाही. सदानंद सुळे हे तिथले मतदार आहेत. हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारा ते तुम्हाला सांगू शकतील, असं सुळे म्हणाल्या.
मागील वेळेस सदानंद सुळे यांनी मिलिंद देवरांना मतदान केलं होतं. त्यांनी पंजाच्या चिन्हाला मतदान केलं होतं. मात्र, यावेळेस हे कोणाला मतदान करतील, ते मला माहित नसल्याचे सुळे यांनी स्पष्ट केले.राम मंदिर कार्यक्रमाला राष्ट्रपती द्रोपती मुरुमु यांना बोलावलं नसल्याचे समजते. यापूर्वी नवीन संसदेच्या उद्घाटनाला देखील त्यांना बोलावलं नव्हतं, हा चुकीचा पायंडा पाडला जात असल्या,चे सुळे यांनी मत व्यक्त केलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.