पुणे

Pune Girl Attack : सदाशिव पेठ तरूणी हल्ला प्रकरण; हवालदारासह तीन पोलीस कर्मचारी निलंबित..

सरकारनामा ब्यूरो

Pune Crime News : पुणे शहरातील विश्रामबाग पोलीस ठाणे (Vishrambag Police Station) अंकित येणाऱ्या पेरूगेट पोलीस चौकीतील (Peru Gate Police Chouwki) पोलीस हवालदारासह तीन पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबिनाची (Three Police Suspended) कारवाई करण्यात आली आहे. या तीन ही पोलीस कर्मचाऱ्यांवर आपल्या कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. या कर्मचाऱ्यांच्या निलंबनाबाबतचे आदेश परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त संदीपसिंह गिल (Sandiap Singh Gill) यांनी गुरुवारी (ता. २८) रात्री जारी केले.

पोलिस हवालदार सुनील शांताराम ताठे, पोलिस कर्मचारी प्रशांत प्रकाश जगदाळे आणि सागर नामदेव राणे अशी निलंबित करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत. सदाशिव पेठेत मंगळवारी (ता. २७ जून) सकाळी एका तरुणाने महाविद्यालयीन तरुणीचा पाठलाग करून तिच्या डोक्यावर आणि हातावर कोयत्याने वार करून जखमी केले होते. तसेच, या घटनावेळी तरुणीसोबत उपस्थित असणाऱ्या त्याच्या मित्रावर कोयत्याने वार करून हाताच्या अंगठ्याला दुखापत केली होती.

या प्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी शंतनू लक्ष्मण जाधव (वय २१) या आरोपीला अटक केली. परंतु पेरूगेट पोलिस चौकीच्या हाकेच्या अंतरावर हा सर्व थरार सुरू असताना, चौकीतील हे तीन पोलिस कर्मचारी कामाच्या ठिकाणावरून गैरहजर होते. त्यामुळे कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी या तीन पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती पोलिस उपायुक्त गिल यांनी दिली. (Latest Marathi News)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT