Sainath Babar And Vasant More Sarkarnama
पुणे

Sainath Babar: मोठी बातमी: मनसेचा पहिला उमेदवार ठरला! पुण्यात साईनाथ बाबर Vs वसंत मोरे?

MNS Sainath Babaris will contest Hadapsar Assembly Constituency: हडपसर मधून मनसेचा नवा शिलेदार साईनाथ बाबर रिंगणात उतरणार आहेत. खुद्द साईनाथ बाबर यांनी व्हाट्सअप स्टेट्स ठेवत हे सांगितले आहे.

Mangesh Mahale

MNS News: लोकसभा निवडणुकीत महायुतीला मदत केल्यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आगामी विधानसभा निवडणुकीत स्वबळाचा नारा दिला आहे. पुण्यातून हालचाली वाढल्या आहेत. मनसे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांनी थेट हडपसर मतदारसंघावर दावा ठोकला आहे.

वसंत मोरे यांनी मनसे सोडल्यानंतर हडपसर मधून मनसेचा नवा शिलेदार साईनाथ बाबर रिंगणात उतरणार आहेत. हडपसरमधून मैदानात उतरणार असल्याचे खुद्द साईनाथ बाबर यांनी व्हाट्सअप स्टेट्स ठेवत सांगितले आहे.

लोकसभा निवडणुकीत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीचा बिनशर्त पाठिंबा दिल्याचे जाहीर केल्यानंतर वसंत मोर यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिली. 'वंचित बहुजन आघाडी'प्रवेश करुन मोरेंनी लोकसभेचं तिकीट मिळवलं. पण पुणेकरांनी त्यांना नाकारलं.

मोरेंचं खासदार होण्याचं स्वप्न भंगले. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वसंत मोरेंनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची 'मशाल'हाती घेतली आहे. ठाकरे गटाकडून मोरे हडपसर विधानसभा मतदारसंघातून रिंगणात असतील, अशी चर्चा आहे. त्यामुळे पुण्यात ठाकरे बंधुंचे शिलेदार बाबर आणि मोरे यांच्या 'सामना'रंगण्याचे चित्र आहे.

लोकसभा निवडणुकीमध्ये राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. त्यानंतर आता त्यांनी विधानसभेत स्वबळाचा नारा दिला आहे. मनसे राज्यात विधानसभेच्या 225 ते 250 जागा लढवणार असल्याचं राज यांनी म्हटलं आहे. त्यामुळे महायुतीला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. राज ठाकरेंच्या या स्वबळाच्या नाऱ्यावरून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी त्यांच्यावर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT