Jayant Patil: सुशीला मोराळे मला शिव्या देत असतील, असं जयंत पाटील का म्हणाले

Beed News Jayant Patil on Sushila Morale: सुशीला मोराळे चळवळीतून पुढे आलेल्या आणि परखड व आक्रमक स्वभावाच्या स्पष्टवक्त्या नेत्या म्हणून ओळखल्या जातात. आपली मते त्या स्पष्टपणे मांडतात, अशी त्यांची ओळख आहे.
Beed News Jayant Patil on Sushila Morale:
Beed News Jayant Patil on Sushila Morale:Sarkarnama
Published on
Updated on

Beed: सुशीला मोराळे मला शिव्या देत असतील. मी फक्त चांगल्याची अपेक्षा करीत नाही. कारण तसे घडले आहे. त्या म्हणत असतील राजाराम बापू पाटलांच्या पोराने माझी संधी घालवली. पण,या सर्व घडामोडी सर्वांच्या चर्चेतून आणि निर्णयातून झाल्या,असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) म्हणाले.

बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या निष्ठवंतांचा मेळावा आणि विधानसभा इच्छुकांची आढावा बैठक जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. खासदार बजरंग सोनवणे, आमदार संदीप क्षीरसागर, युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, प्रदेशाध्यक्ष डॉ. नरेंद्र काळे आदींची उपस्थिती होती. व्यासपीठावर ज्येष्ठ नेत्या प्रा.सुशीला मोराळे देखील उपास्थित होत्या.

भाषणात जयंत पाटील यांनी मोराळे (Sushila Morale) यांच्याकडे पाहत त्या आपल्याला शिव्या देत असतील, असे हसत सांगितले. त्याचे कारण असे प्रा. सुशीला मोराळे लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून इच्छुक होत्या.

त्यांचा जिल्ह्यात विविध ठिकाणी दौरा देखील सुरू होता. याच दरम्यान बजरंग सोनवणे यांनी पक्षात प्रवेश केला आणि समीकरणे बदलली. त्यामुळे आपली संधी गेली आणि आपण देखील याला कारणीभूत असल्याचे समजून सुशीला मोराळे आपल्याला शिव्या देत असतील, असे खुद्द जयंत पाटील म्हणाले.

Beed News Jayant Patil on Sushila Morale:
Uddhav Thackeray: विदर्भात 'आयाराम-गयाराम' सुरू; ठाकरेंचा सहसंपर्क प्रमुख शिंदेंच्या शिवसेनेत

सुशीला मोराळे चळवळीतून पुढे आलेल्या आणि परखड व आक्रमक स्वभावाच्या स्पष्टवक्त्या नेत्या म्हणून ओळखल्या जातात. आपली मते त्या कोणत्याही नेत्यासमोर स्पष्टपणे मांडतात, आपल्या मतापासून त्या दूर जात नाहीत, अशी त्यांची ओळख आहे.

त्यांनी जनता दलाच्या राष्ट्रीय सचिव पदावर देखील काम केलेले आहे. त्यांनी दिवंगत केशरबाई क्षीरसागर यांच्या विरोधात लोकसभा आणि जयदत्त क्षीरसागर यांच्या विरोधात विधानसभा निवडणूक देखील लढविलेली आहे. त्यामुळे जयंत पाटील हसत हसत यांच्यासमोरच तसे म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com