NCP Activist and Haweli Police Sarkarnama
पुणे

Sambhaji Bhide News : संभाजी भिडेंविरोधात कारवाईची मागणी; आंदोलनाचाही इशारा

सरकारनामा ब्यूरो

Police Should Take Action Against Sambhaji Bhide : शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक मनोहर उर्फ संभाजी भिडे वादग्रस्त विधानांमुळे कायम चर्चेत असतात. आता त्यांनी देशाबाबतच वादग्रस्त विधान केले आहे. या विधानामुळे भिडे यांच्यावर राज्यातून टीका होत आहे. १५ ऑगस्ट हा आपला खरा स्वातंत्र्य दिवस नाही, तो काळा दिवस आहे, असे भिडे म्हणाले होते. भिडेंच्या या वादग्रस्त विधानामुळे राज्यात नवा वाद होण्याची शक्यता आहे. (Latest Political News)

संभाजी उर्फ मनोहर भिडे हे सातत्याने निरर्थक, बिनबुडाची विधाने करतात. त्यांच्या या विधानांना बहुजन समाजातील तरुण भूलतात. ते अशा विधानांतून तरुणांची माथी भडकविण्याचे व सामाजिक शांतता बिघडविण्याचे काम सतत होत आहे. आता तर त्यांनी थेट भारताचा स्वातंत्र्य दिन, राष्ट्रगीत व राष्ट्रध्वज यांचा अवमान केला आहे. त्यामुळे भिडे यांच्यावर तातडीने देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

या मागणीचे मानवता सेवा प्रतिष्ठान व राष्ट्रवादी काँग्रेस खडकवासला विधानसभा मतदारसंघ अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष हनुमंत शिवूर यांनी हवेली पोलिसांना निवेदन दिले आहे. या निवेदनात म्हटले की, "संभाजी उर्फ मनोहर भिडे यांनी एका कार्यक्रमात वादग्रस्त विधान केले आहे. यावेळी भिडे यांनी स्वातंत्र्यदिन, राष्ट्रगीत व राष्ट्रध्वज यांचा अवमान केला आहे. तसेच मनोहर भिडे हे सातत्याने देशातील महापुरुषांचा व आदर्शांचा अवमान करणारी वक्तव्ये करत असतात. त्यामुळे त्यांच्यावर तातडीने देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा. त्यांच्यावर कारवाई झाली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल."

हे निवेदन हवेली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन नम यांच्याकडे देण्यात आले आहे. यावेळी कार्यवाही झाली नाही तर मनोहर भिडे यांच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी हनुमंत शिवूर, शिवाजी बनसोडे, अमित कांबळे, सुदाम लोणारे, लखन बाळशंकर, सूरज बनसोडे, अमोल गायकवाड, काशिनाथ कुमे, पैगंबर नदाफ, सुरेश गायकवाड, अरविंद जाधव आदी उपस्थित होते.

काय म्हणाले होते भिडे ?

पुण्यातील दिघी येथे रविवारी (दि. २५) संभाजी भिडे यांचे व्याख्यानाचे आयोजन केले होते. यावेळी भिडे यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. ते म्हणाले होते, "जन गण मन हे राष्ट्रगीत होऊ शकत नाही. कारण रवींद्रनाथ टागोर यांनी ते १८९८ ला इंग्लंडच्या राजाच्या स्वागतासाठी लिहिले होते. १५ ऑगस्ट हा खरा स्वातंत्र्य दिवस नाही. यादिवशी भारताची फाळणी झाली.येणाऱ्या पंधरा ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन साजरा न करता काळा दिवस पाळावा."

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT