Sambhajiraje Chhatrapati Sarkarnama
पुणे

Sambhajiraje Chhatrapati : विशाळगड हिंसाचारावरुन आरोपांच्या फैरींवर फैरीनंतर आली संभाजीराजेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, धर्माचा नव्हे...

Jagdish Patil

Pune News, 7 July : विशाळगडावरील अतिक्रमणावरून कोल्हापुरसह राज्यातील वातावरण तापलं आहे. छत्रपती संभाजीराजे (Sambhajiraje Chhatrapati) यांनी आक्रमक पवित्रा घेत चलो विशाळगडचा नारा दिला. मात्र यावेळी गडावर आलेल्या काही लोकांनी तिथे मोठा हिंसाचार केला.

गडावर आणि गडाच्या पायथ्याशी असलेल्या गावामध्ये वाहनांची, घरांची तसेच इतर मालमत्तेचं मोठ्या प्रमाणात नासधूस करण्यात आली. याबाबतचे अनेक व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

तर या हिंसाचाराला अनेकांनी संभाजीराजे (Sambhajiraje Chhatrapati) यांना कारणीभूत ठरवलं आहे. अशातच आता संभाजीराजे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. छत्रपती संभाजीराजे यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली यावेळी त्यांनी 'गडावर धर्माचा नव्हे तर अतिक्रमणचा विषय होता." असं म्हणत आपण केलेल्या कारवाईचा आनंद असल्याचंही म्हटलं आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना संभाजीराजे म्हणाले, "राज्यातील सर्व लोकांना कल्पना आहे की, मी गडांवर काम करत आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेकांची मागणी होती की, मी विशाळगडावर काम करावं. दीड वर्षपूर्वी आम्ही गडाला भेट दिली होती. तिथे गलिच्छ अतिक्रमण झालं होतं.

तिथल्या स्थानिक लोकांनी देखील मान्य केलं होत की अतिक्रमण झालं आहे. गडावर 158 अतिक्रमणे झाली होती. तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं होतं अतिक्रमण हटवा. पण राजकीय लोकांनी हस्तक्षेप केल्यामुळे स्टे आला, अतिक्रमण न काढण्यासाठी लोकप्रतिनिधींनी दबाव टाकला होता, असा आरोप संभाजीराजे यांनी यावेळी केला."

धर्माचा नव्हे तर अतिक्रमणाचा विषय

तसंच यावेळी त्यांनी हा धर्माचा नव्हे तर अतिक्रमणाचा विषय असल्याचं स्पष्ट केलं. राजे म्हणाले, या ठिकाणी धर्माचा नाही तर अतिक्रमणाचा (Encroachment) विषय होता. या गडाचा इतिहास मोठा आहे. मात्र, अशा गडावर कत्तलखाना आणि अनेक नको ती दुकाने होती. अतिशय गलिच्छ अतिक्रमण झालं होतं. लोक तिथं पार्ट्या करत होते, म्हणून मी आक्रमक झाल्याचं त्यांनी सांगितलं.

गृहराज्यमंत्री पालकमंत्री काहीच बोलले नाहीत

शिवाय या अतिक्रमणाबाबत पालकमंत्री ,तत्कालीन गृहराज्यमंत्री सतेज पाटील (Satej Patil) काही बोलले नाहीत. मग मी आक्रमक झालो यात माझी काय चूक आहे? असा सवाल संभाजीराजे यांनी केला. तर आता माझ्यावर जातीचे आरोप केले जात आहेत. मात्र, अतिक्रमण हटवलं याचा मला आनंद आहे. हे आधीच व्हायला पाहिजे होतं. आता सगळे अतिक्रमण हटवत आहेत. काल एका दिवसात 70 अतिक्रमण हटवली आहेत. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिव भक्तांचे आभार व्यक्त करतो.

या कारवाईला कोणीही जातीच वळण देऊ नये, अशी सर्व नेत्यांना विनंती करतो. मी प्रामाणिकपणे काम करत आहे. गड अतिक्रमण मुक्त झाले पाहिजेत हीच अपेक्षा आहे. जे विशाळगडावर केलं ते राज्यातील इतर किल्ल्यावर देखील करावं ही मुख्यमंत्र्यांना विनंती आहे, असं म्हणत संभाजीराजे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT