Imtiyaaz Jaleel : विशाळगड अतिक्रमण प्रकरणी आता 'एमआयएम' मैदानात; कोल्हापुरात काढणार मोर्चा

Vishalgad Atikraman : तुमच्याबद्दलचा आदर संपला, असे म्हणत अतिक्रमण हटवण्याची ही कुठली पद्धत असा संतप्त सवाल इम्तियाज जलील यांनी संभाजीराजे यांना केला होता.
Imtiyaaz Jaleel
Imtiyaaz JaleelSarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar : विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्यासाठी काही हिंदुत्व संघटनांनी दोन दिवसांपूर्वी आंदोलन केले. या दरम्यान तेथील एका मशिदीची आंदोलकांनी तोडफोड केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

याचा निषेध करून माजी खासादार इम्तियाज जलील यांनी कोल्हापूरमध्ये मोर्चा काढणार असल्याचे स्पष्ट केले. त्यासाठी एमआयएमच्या राज्यभरातील कार्यकर्त्यांना संदेश देण्यात आला आहे. त्यामुळे कोल्हापुरातील वातावरण तापण्याची शक्यता आहे.

समाज माध्यमांवरील व्हिडिओचा हवाला देत राज्यभरातील एमआयएमच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना 19 जुलै रोजी या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी कोल्हापूरात येण्याचे आवाहन केले आहे.

'आनेवाले Friday 19 जुलै को पुरे महाराष्ट्र के युनिट्स ने प्रोटेस्ट karna है कोल्हापूर मे. मद्जिद मे तोडफोड करणेके विरोध मे.,' असा संदेश एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष माजी खासदार इम्तियाज जलील यांनी आपल्या फेसबुकवरून व्हायरल केला आहे.

Imtiyaaz Jaleel
Vishalgarh Encroachment Case : इम्तियाज जलील तेव्हा तुमचा कंठ का फुटला नाही? अंबादास दानवे यांनी सुनावले...

इम्तियाज जलील यांनी कालच विशाळगडावरील घटनेवरुन संभाजीराजे छत्रपती यांच्यावर जोरदार टीका केली होती. तुमच्या बद्दलचा आदर संपला, असे म्हणत अतिक्रमण हटवण्याची ही कुठली पद्धत असा संतप्त सवाल इम्तियाज जलील यांनी केला होता. हल्लोखोरांनी घरात घुसून तोडफोड मारहाण केली, महिलांच्या कुशीत असलेल्या लहान मुलांची त्यांनी पर्वा केली नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

महाराष्ट्रात जंगलराज चालू आहे का? हातात हत्यार घेऊन तुम्ही कुणावरही हल्ला चढवणार, दहशत पसरवणार असाल, तर आम्ही देखील हातात शस्त्र घेऊ शकतो, असा इशारा इम्तियाज यांनी आपल्या फेसबुकवरील व्हिडिओच्या माध्यमातून दिला होता. मुस्लिमांची मते घेऊन आपले खासदार निवडून आणलेल्या महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षावरही इम्तियाज जलील यांनी तोफ डागली होती.

Imtiyaaz Jaleel
Video Vishalgad Fort : मोठी बातमी! विशाळगडावर जाण्यापासून शाहू महाराजांसह नेत्यांना पोलिसांनी रोखलं

या लोकांना मुस्लिमांची फक्त मत पाहिजे आहेत. आता मतांसाठी हात जोडणारे आणि तुम्हाला या तीन पक्षांना मतदान करायला लावणारे मौलाना कुठे गेले? असा सवाल इम्तियाज जलील यांनी केला होता. त्यानंतर आता थेट कोल्हापूरात मोर्चा काढण्याची घोषणा करत इम्तियाज जलील यांनी राज्यभरातील पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांना येण्याचे आवाहन केले आहे.

आधीच या घटनेवरून राज्यातील राजकारण तापले आहे, त्यात एमआयएमने कोल्हापूरात मोर्चा काढण्याची घोषणा केल्याने वातावरण आणखी चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com