Uddhav Thaceray-Sambhajiraje
Uddhav Thaceray-Sambhajiraje Sarkarnama
पुणे

उद्धव ठाकरेंनी तुमच्याकडून हमीपत्र मागितले होते का, या प्रश्नावर संभाजीराजे म्हणाले..

सरकारनामा ब्यूरो

पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटाकडून आता उद्धव ठाकरे गटावर हल्ले सुरू झाले आहेत. शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje) यांना राज्यसभेची उमेदवारी शिवसेनेने न देण्याचा मुद्दा या निमित्ताने काढून छत्रपतींकडून हमीपत्र मागण्याचे चुकीचे धाडस ठाकरे यांनी केले होते, अशी टीका केली. तसेच शिवाजी महाराजांच्या नावाने पक्ष चालवता आणि छत्रपतींना राज्यसभेची उमेदवारी देत नाही, अशी टीका केली होती. पक्ष चालवण्याचा उद्धव ठाकरे यांना अधिकार नाही असाही आरोप केसरकर यांनी केला होता.

केसरकरांनी केलेल्या या आरोपावर पुण्यातील पत्रकारांनी संभाजी राजेंना त्यांचे मत विचारले. त्यावर उत्तर देताना संभाजी राजे म्हणाले, ‘‘तो विषय माझ्यासाठी संपला आहे. माझे जे काही मत होते ते मी राज्यसभेतून बाहेर पडताना शिवाजी महाराजांचे स्मरण करून बोललो आहे. आता त्यावर मला काहीही भाष्य करायचे नाही. माझ्यात आणि शिवसेनेमध्ये राज्यसभेच्या उमेदवारीवरून ड्राफ्ट तयार करण्यात आला होता हे सत्य आहे. दिलेला शब्द त्यांनी पाळला नाही हे देखील सत्य आहे.

राज्यसभेची उमेदवारीवरून जे काही झाले तो विषय माझ्यासाठी संपलेला आहे आणि मला त्या विषयी काहीही चर्चा करायची नाही. केसरकर जे काही बोलले असतील त्या त्यांच्या भावना आहेत. माझी मते मी तेव्हाच पत्रकार परिषदेत स्पष्टपणे आणि सविस्तरपणे सांगितली होती, असे संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT