Ajit pawar sangram thopte shankar mandekar (1).jpg Sarkarnama
पुणे

Sangram Thopate News: संग्राम थोपटेंना भोरमध्ये मोठा धक्का; आमदार मांडेकरांनीही संधी साधली; म्हणाले,'जे नवीन भाजपात आले...'

Bhor Politics: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये स्थानिक नेत्यांना कोणासोबत युती आघाडी करायचं याबाबतच स्वातंत्र्य वरिष्ठांनी दिले आहे. त्यामुळे भोर विधानसभा मतदारसंघात आम्ही राष्ट्रवादी म्हणून स्वबळावर निवडणूक लढवणार असून आमच्यासमोर भाजपचं आव्हान असणार आहे.

Sudesh Mitkar

Pune News : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पुणे जिल्ह्यात भाजप विरुद्ध उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राष्ट्रवादी असा थेट सामना होणार आहे. एकीकडे भाजपने अनेक नेत्यांना पक्षात घेऊन पुणे जिल्ह्यात आपली ताकद वाढवण्यात सुरुवात केली असताना दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसकडून देखील मातब्बर नेते गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये शनिवारी (ता.8) भोरमधील माजी नगराध्यक्ष निर्मला आवारे यांचा राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश झाला. आवारे या माजी आमदार आणि सध्या भाजपचे नेते असलेल्या संग्राम थोपटे (Sangram Thopate) यांच्या निकटवर्तीय मानल्या जात होत्या. मात्र त्यांनी भाजपचा पर्याय न स्वीकारता अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने आता भोरमध्ये थेट भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असाच सामना रंगणार असल्याचे समोर आलं आहे.

अशातच भोरचे आमदार शंकर मांडेकर यांनी संग्राम थोपटे यांच्यावर टीका करत त्यांना आपण भाजपचं मानत नसल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे आता आगामी निवडणुकांमध्ये या महायुतीतील दोन नेत्यांचा संघर्ष आणखी विकोपाला जाण्याची शक्यता आहे.

याबाबत माध्यमांशी बोलताना आमदार शंकर मांडेकर म्हणाले, सध्या भोर विधानसभा मतदारसंघांमधील भाजप ही थोपटे भाजप झाली आहे. आणि या थोपटे भाजपच्या विरुद्ध लढण्यासाठी राष्ट्रवादी सक्षम आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आम्हाला राष्ट्रवादीचा झेंडा फडकावायचा असून भाजपसह इतर पक्षातील कोणी जरी आमच्याकडे आलं तर आम्ही त्यांना सामावून घेणार आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये स्थानिक नेत्यांना कोणासोबत युती आघाडी करायचं याबाबतच स्वातंत्र्य वरिष्ठांनी दिले आहे. त्यामुळे भोर विधानसभा मतदारसंघात आम्ही राष्ट्रवादी म्हणून स्वबळावर निवडणूक लढवणार असून आमच्यासमोर भाजपचं (BJP) आव्हान असणार आहे. मात्र, भाजपशी दोन हात करताना इतर पक्ष आमच्यासोबत आले तर त्यांना सोबत घेऊन आम्ही निवडणूक लढवण्याचे रणनीती तयार करत आहे.

मी विधानसभा निवडणूक लढली, त्यावेळेस जी जुनी भाजप आमच्यासोबत होती. ती जुनी भाजप ही खरी भाजप आहे, असं आम्ही मानतो. जे नवीन भाजपमध्ये आलेले आहेत त्यांना आम्ही स्वीकारत नाही. आणि इतरही कोणीच त्यांना स्वीकारत नाही. पक्ष वाढवण्याचा ज्याचा त्याचा अधिकार आहे. त्यामुळे त्यांना भाजपने घेतला आहे.

मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आम्हाला त्यांच्याविरोधात लढायचं असल्याचं मांडेकर यांनी सांगत नाव न घेता माजी आमदार संग्राम थोपटे यांच्यावर निशाणा साधला. भोरमध्ये विचार केला तर थोपटेंच्या भाजप विरोधात आमची ,खरी लढाई असणार असून त्या ठिकाणी आम्ही राष्ट्रवादी म्हणून ती लढाई लढणार असल्याचं मांडेकर म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT