Tanaji Sawant Statement: महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप? मंत्रिपदावरून नाराज असलेल्या सावंतांचा नवा राजकीय बॉम्ब; म्हणाले,'राज्यात 2022 ला असं काही...'

Tanaji Sawant On Mahayuti : देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारमध्ये मंत्रिपदाची संधी न मिळाल्यामुळे तानाजी सावंत हे नाराज असल्याची चर्चा आहे. त्यांनी यापूर्वीही तसे संकेत दिले आहेत. राज्यात 2022 मध्ये सत्तांतर घडवण्यासाठी 150 हून अधिक बैठका झाल्याचा दावा केल्यानंतर आता पुन्हा एकदा तानाजी सावंत राजकीय भूकंपाचे संकेत परंडा येथे दिले आहेत.
Tanaji Sawant
Tanaji SawantSarkarnama
Published on
Updated on

Dharashiv News:महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय घडेल याचा सध्याच्या घडीला तरी कोणालाही अंदाज बांधणं शक्य नाही. 2019 ते 2024 च्या च्या विधानसभा निवडणुकीपर्यंत राज्याच्या राजकारणाला अनेक मोठ्या राजकीय भूकंपाचे हादरे बसले. यातलं 2022 मधल्या एकनाथ शिंदेंच्या बंडानं तर महाविकास आघाडीचं सरकारही पाडलं. या बंडाची धग तीन वर्षांनंतर आजही कायम आहे. पण शिवसेनेतील याच बंडाचा संदर्भ देत आता भूम परंडा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या भूकंपाचे संकेत दिले आहेत.

माजी मंत्री आणि शिवसेनेचे नेते तानाजी सावंत हे त्यांच्या आक्रमकबाणा आणि वादग्रस्त विधानांनी नेहमीच चर्चेत असतात. आता त्यांनी पुन्हा एकदा धाराशिव जिल्ह्यातील परांडा येथे एका कार्यक्रमात बोलताना मोठं विधान केलं आहे. ते म्हणाले, राज्यात 2022 ला असं काही घडेल वाटलं होतं? पण घडलं! मग आता का घडू शकत नाही? काय अडचण आहे? 234 आहेत.. बघूया..2 काय आणि 234 काय? सगळे माणसचं आहेत ना? असं वक्तव्य करत सावंत यांनी राजकारण तापवलं आहे,

2024 मध्ये पुन्हा महाराष्ट्राच्या सत्तेत परतलेल्या महायुती सरकारमध्ये तानाजी सावंतांचा मंत्रि‍पदाच्या शर्यतीतून अचानक पत्ता कट करण्यात आला होता. धाराशिव जिल्ह्यातील चार विधानसभेसाठी महाविकास आघाडीचे दोन तर महायुतीचे दोन उमेदवार निवडून आले आहेत. परंडा विधानसभा मतदारसंघातून शेवटच्या फेरीत तानाजी सावंतांचा निसटता विजयी झाला होता. त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल मोटे यांचा अवघ्या 1509 मतांनी पराभव केला. यानंतर ते कित्येक महिने मतदारसंघात फिरकले पण नव्हते. आता पुन्हा एकदा सावंत मैदानात उतरले आहेत.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे धाराशिव जिल्ह्यातील पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी आले असतानाही माजी मंत्री तानाजी सावंत हे आक्रमक शैलीत दिसून आले होते. आता आगामी जिल्हा परिषद,पंचायत समिती, नगरपरिषदा,नगरपंचायती या निवडणुकांसाठी दंड थोपटलं आहे. त्यांनी आगामी स्थानिकच्या निवडणुकीत सर्वधर्म समभाव, आपली एकी आणि आपला अजेंडा घेऊन जायचं. आपला अजेंडा कोणाला बदनाम करण्याचा नाही. आपला अजेंडा विकासाचा आहे असं स्पष्ट भूमिका मांडली आहे.

Tanaji Sawant
Rajan Patil : भाजप नेत्यांना प्रवेशापूर्वी राजन पाटलांनी कोणती अट घातली होती?; जाहीर सभेत उलगडले गुपित

याचवेळी त्यांनी धाराशिव जिल्ह्यात शिवसेनेकडून एकला चलो रे चा नारा दिला आहे. त्यांनी अंडर करंट वेगळे असतात. जे दिसतं ते वास्तव नसतं. जे चालतंय ते एक, आणि जे होतंय ते दुसरंच असतं. मतदारसंघाच्या विकासाची दिशा चुकली तर सरकारसमोर आव्हान केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असं खळबळजनक वक्तव्य आमदार तानाजी सावंत यांनी केलं आहे.

मंत्रिपदावरून नाराज असलेल्या सावंतांनी मोठा राजकीय बॉम्ब टाकला. ते म्हणाले, यांच्याकडे 234 आमदार आहेत म्हणतात… मग 2 असो किंवा 234 असो, अर्थ एकच आहे… माणसंच आहेत की! घाबरण्याचं काही कारण नसल्याचंही ठणकावलं. सावंतांच्या या खळबळजनक विधानानंतर परंडा व धाराशिव जिल्ह्यातील महायुतीत सारंकाही आलबेल सुरू नसल्याचीच चर्चा सुरू झाली आहे.

Tanaji Sawant
Narayan Rane : भाजप-शिवसेना युतीत फूट? “शिंदेंसोबत संबंध तोडू”, राणेंचा इशारा; “आम्ही हतबल नाही” म्हणत शिंदेंच्या शिलेदाराचाही पलटवार

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारमध्ये मंत्रिपदाची संधी न मिळाल्यामुळे तानाजी सावंत हे नाराज असल्याची चर्चा आहे. त्यांनी यापूर्वीही तसे संकेत दिले आहेत. राज्यात 2022 मध्ये सत्तांतर घडवण्यासाठी 150 हून अधिक बैठका झाल्याचा दावा केल्यानंतर आता पुन्हा एकदा तानाजी सावंत राजकीय भूकंपाचे संकेत परंडा येथे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलताना दिले आहेत. त्यांनी यावेळी बहुमतातील महायुती सरकारलाच ललकारलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com