Pune News : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेतृत्व करत असलेल्या शिवसेनेचे बुलढाणा येथील आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवास येथे कँटिनमध्ये मारहाण केल्याचा प्रकार मंगळवारी रात्री समोर आला. निकृष्ट जेवण दिल्यानंतर संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी कँटीनमधील कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.
शिवसेना संजय गायकवाड हे मंगळवारी आमदार निवासामध्ये मुक्कामाला होते. त्यांनी आमदार निवासातील कॅन्टीनमधून जेवण मागवले आणि पण त्यांच्यासमोर शिळे अन्न येताच त्यांचा संताप झाला. थेट टॉवेल आणि बनियनवर कॅन्टीन गाठले. तेथे त्यांनी कॅन्टीनमधील कर्मचाऱ्याला भाजीचा वास घेण्यास सांगितले.
तसेच निकृष्ट जेवण देता का म्हणत कर्मचाऱ्याला मारहाण केली. ते मारहाण करत असताना काही जणांनी त्यांचा व्हिडिओ शूट केला. त्यांचा हा व्हिडिओ समोर आल्यानंतर विरोधकांकडून सरकारला धारेवर धरण्यात येत आहे.
असंच असलं तरी अद्याप पर्यंत गायकवाड यांच्यावर उद्यापर्यंत कोणतीही पोलीस तक्रार दाखल झाली नव्हती. त्यामुळे पुण्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांनी याबाबतची तक्रार पुणे आयुक्तलयात दाखल केली आहे.
याबाबत बोलताना शिवसेना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) पक्षाच्या पिंपरी चिंचवड युवक अध्यक्ष चेतन पवार म्हणाले, अतिशय कमी मतांनी निवडून आलेल्या बुलढाणा येथील लोकप्रतिनिधींनी कॅन्टीनमधील गरीब कर्मचाऱ्यांना अमानुष मारहाण केल्या असल्याबाबतचा व्हिडिओ माझ्या पाहण्यात आला.
या घटनेला कित्येक तास उलटून गेल्यानंतर देखील राज्यातील कोणत्याच पोलीस स्टेशनमध्ये त्याबाबतची तक्रार दाखल झालेली नव्हती. त्यामुळे आज पुणे पोलीस आयुक्तालयात जाऊन आमदार संजय गायकवाड यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.
तीन दिवसांत माझ्या तक्रारीची दखल जर पोलिसांनी घेतली नाही, तर मी कोर्टाच्या माध्यमातून गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा यासाठी प्रयत्न करणार आहे. एका लोकप्रतिनिधींकडून अशा पद्धतीने अमानुष मारहाण होत असेल तर ही गंभीर गोष्ट असल्याचंही तक्रारकर्त्यानं म्हटलं आहे.
त्यांनी टॉवेल आणि बनियनवर कॅन्टीनमध्ये जात मारहाण केली. जर या मारहाणी दरम्यान त्यांचा टॉवेल सटकला असता, तर महाराष्ट्रानं कोणती संस्कृती पाहिली असती, असा टोला लगावत गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणी असल्याचं चेतन पवार यांनी सांगितलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.