Sanjay Raut News , bhima patas sugar factory Sarkarnama
पुणे

Sanjay Raut News : ''पत्रा चाळ घोटाळ्यातील आरोपीने हार घातल्याने पुतळा अपवित्र झाला; म्हणून आम्ही अभिषेक केला...''

Bhima Patas Sugar Factory : पत्राचाळ प्रकरणातील आरोपीने हार घातल्याने पुतळा अपवित्र....

सरकारनामा ब्यूरो

Daund : ठाकरे गटाचे नेते व खासदार यांनी संजय राऊत यांची बुधवारी(दि.२६) दौंड तालुक्यातील वरवंड या ठिकाणी जाहीर सभा झाली. यावेळी त्यांनी भाजप आमदार राहूल कूल यांच्यासह शिंदे फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. मात्र, या सभेआधी कलम १४४ झुगारत राऊत यांनी भाजप आमदार राहुल कुल यांच्या दौंडमधल्या भीमा पाटस साखर कारखान्यावर धडक दिली.

त्यावेळी त्यांनी कारखान्याच्या आवारातल्या भीमा पाटस कारखान्याचे संस्थापक मधुकर शितोळे यांच्या पुतळ्याला पुष्पहार घातला. मात्र, आता त्यानंतर आता कामगारांनी शितोळे यांच्या पुतळ्याला कामगारांनी दुग्धाभिषेक करण्यात आला आहे. यामुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

भीमा पाटस कारखान्याचे संस्थापक मधुकर शितोळे यांच्या पुतळ्याला कामगारांनी दुग्धाभिषेक घातला आहे. संजय राऊत(Sanjay Raut) यांच्यामुळे हा पुतळा अपवित्र झाला आहे असं म्हणत हा दूग्धाभिषेक कऱण्यात आला. बुधवारी भीमा पाटस कारखान्यात गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत संजय राऊत यांनी दौंड इथे सभा घेतली होती. त्याचा आधी त्यांनी कारखान्यात जाऊन शितोळे यांच्या पुतळ्याला हार घातला होता. पत्राचाळ प्रकरणातील आरोपीने हार घातल्याने पुतळा अपवित्र झाला असं म्हणत आज हा हार काढून कामगारांनी पुतळ्याला दुग्धाभिषेक घातला.

दौंड तालुक्यातील भीमा पाटस सहकारी साखर कारखान्यातील कथित भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन खासदार संजय राऊत यांनी भाजप आमदार राहुल कुल यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. या कारखान्यात 500 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप करत याप्रकरणाची ईडी आणि सीबीआयमार्फत चौकशी करावी अशी मागणी संजय राऊत यांनी केली होती. पण या आरोपांनंतरही राज्य सरकारकडून किंवा संबंधित तपास यंत्रणांकडून पावलं उचलण्यात आली नव्हती.

सभेआधी पोलीस आणि राऊतांमध्ये वादावादी

संजय राऊत यांची जाहीर सभा वरवंड या ठिकाणी झाली. त्याआधी खासदार संजय राऊतांनी भाजप आमदार राहुल कुल यांच्या दौंडमधल्या भीमा पाटस कारखान्यावर धड़क दिली. वाटेत त्यांना पोलिसांनी अडवलं. त्यामुळे राऊत आणि पोलिसांमध्ये वादावादी झाली. खासदाराला अडवलं म्हणून हक्कभंग आणण्याचा इशारा राऊतंनी पोलिसांना दिला. अखेर पोलिसांनी राऊतांना कारखान्याच्या आवारात जाऊ दिलं. कारखान्याच्या आवारातल्या पुतळ्याला राऊतांनी पुष्पहार घातला त्यानंतर राऊत सभेच्या ठिकाणी रवाना झाले.

...तर गुंडशाहीला गुंडाशाहीने उत्तर देण्याची ताकद

पोलिसांनी अडवल्यानंतर खासदार संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांना उत्तरं दिली. ही गुंडशाही आणि झुंडशाही आहे. वेळ पडली तर गुंडशाहीला गुंडाशाहीने उत्तर देण्याची ताकद आमच्यात असल्याचं राऊत यांनी म्हटलं आहे. कारखान्याचा दरवाजा बंद करण्यात आला आहे, यावरुन ते किती घाबरले आहेत, हे दिसतं. हा कारखाना इतर कोणत्या पक्षाच्या खासदाराचा किंवा आमदाराचा असता तर हे पोलीस किरीट सोमय्यांना स्वत: आतमध्ये घेऊन गेले असते असा टोलाही राऊत यांनी लगावलाय. केंद्रात पोलिसांवर हक्कभंग आणण्याची मागणी करणार असल्याचंही राऊत यांनी म्हटलंय.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT