Sanjay Raut Sarkarnama
पुणे

Sanjay Raut: कार्यकर्त्यांना संपवण्याचं कारस्थान सुरू; 'चिमटे नाही, आता थेट हल्ल्यांची गरज' : संजय राऊतांचा घणाघात

Sanjay Raut, BJP Criticism, Political Statement: पुण्यातील कार्यक्रमात संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका करत कार्यकर्त्यांची निष्ठा संपवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला. तसेच राजकीय दडपशाही आणि पक्षांतराच्या मुद्द्यांवर भाष्य केले.

Sudesh Mitkar

Sanjay raut: सध्या पश्चिम बंगालमधील काँग्रेसचे काही खासदार पक्षातून वेगळे होवून आपला स्वतंत्र गट स्थापन करणार असल्याचं बोललं जात आहे. गेल्या काही काळापासून वेगवेगळ्या पक्षातील गट भाजपमध्ये सहभागी होत असल्याचे पाहायला मिळत आहे. यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते व खासदार संजय राऊत यांनी भाष्य केले.

पुण्यातील एका पुरस्कार वितरण कार्यक्रमादरम्यान संजय राऊत बोलत होते. राऊत म्हणाले आज देशात हुकूमशाहीचे वातावरण असून सामान्य जनतेला आणि कार्यकर्त्यांना संपवण्याचे कारस्थान सुरू आहे. सध्याचे सत्ताधारी सरकार निष्ठावंत कार्यकर्ता ही जमातच नष्ट करण्याचे आणि त्यांना संपवण्याचे काम करत आहे. अशा काळात केवळ चिमटे काढून चालणार नाही, तर थेट हल्ला करण्याची गरज आहे. या देशाला आज चिमट्यांची नव्हे, तर थेट आणि रोखठोक हल्ल्यांचीच गरज आहे.

आजकाल प्रामाणिक कार्यकर्ते कमी प्रमाणात पाहिले मिळतात. काँग्रेसने ज्यांना मुख्यमंत्री, राज्यपाल केले, तेच लोक स्वाभिमान आणि निष्ठा विकून पळून गेल्याची उदाहरण आहेत. आज पश्चिम बंगाल असो की संपूर्ण देश, कार्यकर्ता ही जमातच पूर्णपणे नष्ट करायची, असे या सरकारने ठरवले आहे. कार्यकर्त्याला बाजारातील भाव द्यायचा, असे चालू झाले आहे. आज निवडून आलेल्या लोकांना हमीभाव पक्का आहे. हा भाव देऊन त्यांना विकत घ्यायचे आणि जर ते सोबत आले नाहीत, तर थेट तुरुंगात टाकायचे, अशी दडपशाही सुरू आहे. आज विचारांशी कोणतीही बांधिलकी राहिलेली नाही. हे सरकार निष्ठावंत कार्यकर्ता संपवण्याचे काम करत आहे.

ब्रिटिश राजवटीचे उदाहरण देत संजय राऊत म्हणाले, पूर्वी ब्रिटिश आपल्या सोयीसाठी काही जातींना गुन्हेगारी जाती ठरवायचे. अत्यंत दुर्दैवाने तीच प्रथा आजही देशात सुरू आहे. आज देशाचे पंतप्रधान स्वतः ठरवतात की गुन्हेगार कोण! कोणाच्या मागे ’ईडी’ लावायची, कोणाला जेलमध्ये टाकायचे, हे वरून ठरवले जाते. यशवंतराव चव्हाण ते शरद पवार यांनी ज्या उपेक्षित समाजाला प्रवाहात आणण्यासाठी आयुष्य वेचले, त्यांचे अस्तित्व आज पुन्हा धोक्यात आले आहे.

देशातील आर्थिक गैरव्यवहारांवर बोट ठेवत त्यांनी संताप व्यक्त केला, चोरी केली म्हणून गरिबाला, पारधी समाजातील माणसाला तात्काळ पकडून नेले जाते. मात्र, दुसरीकडे देशातील बँकांचे तब्बल १५ लाख कोटी रुपये चोरून राजेश मेहता सारखे लोक सहज पसार होतात. गेल्या १२ वर्षांत बँकांचे पैसे बुडविणार्‍या बड्या उद्योगपतींचे १४ लाख कोटी रुपये माफ करण्यात आले. देशात रोज १०० बँक फ्रॉड होत आहेत. हे बँक लुटणारे काय राज्यातील गुन्हेगारी जमातीचे आहेत का? मग गुन्हेगार केवळ सामान्य लोकच कसे ठरतात? असा सवाल यावेळी राऊत यांनी उपस्थित केला.

राम मंदिर प्रकरणात माझ्यावर सीबीआय केस आहे, चार्जशीटमध्ये माझे नाव आहे. पण प्रत्यक्ष अयोध्येच्या राम मंदिरातील दानपेटीतून ५ कोटी रुपये चोरीला गेले, त्यावर देशाचे पंतप्रधान बोलायला तयार नाहीत. तिथले सीसीटीव्ही फुटेजही चोरीला गेले. अयोध्येला दहशतवाद्यांपासून धोका असल्याचे सांगून भीती निर्माण केली जात आहे, मग ही ५ कोटींची दानपेटी काय दहशतवाद्यांनी पळवली? भाजपचेच खासदार ब्रिजभूषण सिंह म्हणतात की, माझ्याकडे नावे आहेत, पण मी बोललो तर ते माझे नाव घेतील. ही कसली पारदर्शकता? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT