पुणे : राजकीय मतभेदातून आरोप-प्रत्यारोप करताना शिवराळ भाषा वापरणे योग्य नाही.त्यामुळे शिवसेना नेते, खासदार संजय राऊत सध्या वापरत असलेली शिवराळ भाषा चुकीची आहे, असे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athavale) यांनी आज पुण्यात व्यक्त केले.
सत्तेत असलेल्या लोकांनी अधिक जबाबदारीने बोलण्याची गरज आहे. सत्तेत असताना उलट-सुलट बोलणे पूर्णत: चुकीचे आहे.टीका करताना किंवा कुणाविषयी बोलताना त्याचा बाप काढण्याची गरज काय ? असा प्रश्न आठवले यांनी केला.भाजपा-शिवसेनेतील वाद मिटण्यासाठी आपण प्रयत्न करू, असे आठवले यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘ भाजपा-शिवसेनेची अनेक वर्षांची दोस्ती आता दुष्मनीत बदलली असून त्यातून मार्ग काढला पाहिजे.या विषयात मी उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणार आहे. दोन्ही पक्षातील वाद मिटला पाहिजे यासाठी मी प्रयत्न करणार आहे.राजकारणात काहीही होऊ शकतं. त्यामुळे भाजपा-शिवसेना एकत्र येऊन दोन्ही पक्षांनी राज्याचा विकास साधला पाहिजे.’’
भाजपा नेते माजी खासदार किरीट सोमय्या व शिवसेने नेते खासदार संजय राऊत यांच्यात सध्या आरोप-प्रत्यारोप सुरू आहे. माजी खासदार सोमय्या यांच्याविषयी बोलताना खासदार राऊत अत्यंत चुकीची भाषा वापरत आहेत. खासदार राऊत यांच्या भाषेवरून आक्षेप घेतले जात असताना यावर केंद्रीय मंत्री आठवले यांनी भूमिका मांडली आहे. टीका करताना खासदार संजय राऊत यांनी योग्य भाषा वापरावी, असे आवाहन आठवले यांनी यावेळी केले.
पुणे महापालिकेची निवडणूक रिपब्लिकन पक्ष भाजपासोबत लढणार आहे. या निवडणुकीत आमच्या पक्षाला किमान २५ जागा मिळाव्यात अशी मागणी आठवले यांनी केली.आम्ही महापालिका एकत्र लढू आणि जिंकून येऊ असा विश्वास आठवले यांनी व्यक्त केला.उत्तरप्रदेशासह देशातील पाच राज्यात सध्या निवडणुका सुरू आहेत.या पाचही राज्यात भाजपाबरोबर आम्ही आहोत.या सर्व ठिकाणी भाजपा सत्तेत येऊ, असे आठवले यांनी सांगितले.
Edited By : Umesh Ghongade
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.