चंद्रकांत पाटील म्हणतात; संजय राऊतांनी रोज तीच-तीच प्रवचने देऊन काय होणार ?

ईडीकडे तीनवेळा तक्रार अर्ज दिला तरी पुढे काहीही होत नाही अशी तक्रार माध्यमांशी बोलताना शिवसेना नेते खासदार संजय राऊत यानी केली होती.
Chandrakant Patil-Sanjay Raut
Chandrakant Patil-Sanjay RautSarkarnama
Published on
Updated on

पुणे : ‘ईडी’कडे तक्रार करून दखल घेतली जात नाही अशी संजय राऊत (Sanjay Raut) यांची तक्रार असेल तर त्यांनी न्यायालयात जावे, त्याच विषयावर रोज प्रवचने करून काहीही होणार नाही, अशी टीका भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी आज व्यक्त केले.

Chandrakant Patil-Sanjay Raut
मनसेचं 'मराठी कार्ड' ; राज ठाकरेंकडून कार्यकर्त्यांना सूचना

ईडीकडे तीनवेळा तक्रार अर्ज दिला तरी पुढे काहीही होत नाही अशी तक्रार माध्यमांशी बोलताना शिवसेना नेते खासदार संजय राऊत यानी केली होती. त्यावर बोलताना प्रदेशाध्यक्ष पाटील म्हणाले, ‘‘ माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या प्रकरणात ॲड. जयश्री पाटील यांनी सुरवातीला डोंगरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. मात्र, त्याची दखल पोलिसांन घेतली नव्हती. त्यामुळे ॲड. पाटील यांनी न्यायालयात धाव घेतली.त्यानंतर न्यायालयाने या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश दिले. या तपासात दरमहा शंभर कोटी रूपयांचे प्रकरण बाहेर आले.त्यामुळे संजय राऊत यांच्या रोज तेच-तेच बोलण्याने काहीही होणार नाही. त्यांनी नुसती प्रवचने देण्यापेक्षा न्यायालयात दाद मागावी.’’

Chandrakant Patil-Sanjay Raut
भगवद् गीता पठणावरुन भाजप-शिवसेनेत नवा अध्याय ; राणे भडकले

शिवनेरी किल्ल्यावर एका तरूणाने मराठा आरक्षणाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना जाब विचारला. तरूणांची ही भावना प्रातिनिधीत स्वरूपाची असून राज्यातल्या गावागावतील तरूणांमध्येच अशीच भावना आहे. मराठा आरक्षण, धनगर समाजाचे आरक्षण व ओबीसी आरक्षण या साऱ्या आरक्षणांची या सरकारने वाट लावली आहे.या सरकारच्या विरोधात गावागावातील तरूणांमध्ये असंतोषाची भावना असून हे तरूण या सरकारमधील मंत्र्यांना रस्त्यावर फिरू देणार नाहीत, अशी वेळ येणार आहे, असे पाटील यांनी सांगितले.

पाटील म्हणाले, ‘‘ आताची भाजपा एक बलशाली पक्ष आहे. त्यामुळे प्रभागांची मोडतोड करून काहीही होणार नाही.पुण्यासह सर्वत्र आम्ही समर्थपणे तोंड देऊन निवडणुका जिंकल्याशिवाय राहणार नाही.मुबंईत राज ठाकरे यांची भेट भाजपाचे काही पदाधिकारी घेत असले तरी निवडणुकीत मनसेबरोबर युती होणार नाही. मुंबईत भाजपा स्वबळावर लढणार आहे.’’

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com