Sanjogh Waghere, Shrirang Barne Sarkarnama
पुणे

Maval Lok Sabha Constituency : रावणाची उपमा देत श्रीरंग बारणेंवर निशाणा; संजोग वाघेरे नेमके काय म्हणाले?

Shrirang Barne Vs Sanjog Waghere : मला माझ्या समोरचा उमेदवार कोण आहे, हे सध्या तरी माहीत नाही, असे म्हणत बारणेंनी आपण वाघेरेंना फारच हलक्यात घेतल्याचे स्पष्ट केले.

Sunil Balasaheb Dhumal

Maval Lok Sabha Political News : लोकसभा निवडणुकीमुळे राज्याचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सर्व मतदारसंघांतील प्रतिस्पर्धी उमेदवार एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. काही ठिकाणी उणी-दुणी काढत, इतिहास उगळत चिखलफेकही केली जात आहे. अशा वातावरणात मात्र मावळचे खासदार श्रीरंग बारणेंनी माझ्या विरोधात कोण आहे, हे मला माहीत नाही, असा टोला महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरेंना लगावला होता. यावर वाघेरेंनी बारणेंना रावणाची उपमा देत सडेतोड प्रत्युत्तर दिले. परिणामी मावळातील उभय उमेदवारांत चांगलाच कलगीतुरा रंगल्याचे दिसून येत आहे.

मावळ लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार शिंदे गटाचे श्रीरंग बारणे आहेत, तर महाविकास आघाडीचे उमेदवार हे ठाकरे गटाचे संजोग वाघेरे Sanjog Waghere आहेत. मावळात दोन्ही नेत्यांनी प्रचाराची राळ उठवली आहे. दरम्यान, पिंपरी चिंडवड येथे बारणेंनी आपण वाघेरेंना अगदीच हलक्यात घेतल्याचे संकेत दिले. ते म्हणाले, मला माझ्या समोरचा उमेदवार कोण आहे, हे सध्या तरी माहीत नाही, असे म्हणत बारणेंनी आपण वाघेरेंना फारच हलक्यात घेतल्याचे स्पष्ट केले. यावर वाघेरेंनीही बारणेंचा अहंकार वाढल्याचे म्हणत पलटवार केला आहे.

संजोग वाघेरे मावळच्या तळेगावमध्ये आले असता गावभेटीदरम्यान साम टीव्हीशी बोलत होते. या वेळी वाघेरे म्हणाले, श्रीरंग बारणेंचा Shrirang Barne अहंकार वाढला आहे. त्यांनी मात्र लक्षात ठेवले पाहिजे, की या देशात रावणाचा अहंकार टिकला नाही, तर आपण कोण? येत्या 13 तारखेला त्यांच्या अहंकाराचा मतदारच अंत करेल, अशी जहरी टीका केली आहे. बारणे आणि वाघेरे यांच्या आरोप - प्रत्यारोपांनी मावळचे वातावरण ढवळून निघाले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी दोन वेळा आपला मतदारसंघ राखला आहे. गेल्यावेळी त्यांनी तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवारांचा मोठ्या फरकाने पराभव केला होता. आता बदलेल्या राजकीय स्थितीत यंदा उपमुख्यमंत्री अजित पवारच बारणेंच्या प्रचारासाठी उतरले आहेत. त्यांच्याविरोधात पूर्वाश्रमीचे अजितदादांचे शिलेदार आणि ठाकरे गटात गेलेले संजोग वाघेरेंना आव्हान उभे केले आहे.

(Edited by Sunil Dhumal)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT